Employment Guarantee Scheme esakla
नाशिक

Employment Guarantee Scheme : ‘रोहयो’वरील मजुरांना 24 रुपयांची वाढ

Nashik News : राज्य शासनाने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची मजुरी प्रतिदिन २४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्य शासनाने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची मजुरी प्रतिदिन २४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मजुरांना प्रतिदिन २७३ मिळत होते. यात २४ रुपयांची वाढ झाल्याने आता मजुरांना २९७ रुपये मजुरी मिळणार आहे. याच लाभ जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेवर काम करत असलेल्या २६ हजार १७८ मजुरांना होणार आहे.

केंद्र सरकारने ‘मागेल त्याच्या हाताला काम’ देण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. योजनेतून सिंचन विहीर, शेततळे, शोषखड्डे, बांधदुरुस्ती, दगडी बांध, वृक्षलागवड, रोपवाटिका, वैयक्तिक वनजमीन पट्ट्यांचा विकास, घरकुल, शौचालय, गोठा, कुक्कुटपालन शेड बांधकाम आदी कामे केली जातात. योजनेत फळबागांसाठी राज्य सरकारने केळी पिकाचा समावेश केला आहे.

या योजनेतून गरजूंना वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध व्हावा, हा मुख्य उद्देश राखलेला आहे. आता तर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये मोठीच वाढ झाली आहे. त्यात रुपये प्रतिदिवस मजुरीत मजुरांना काम करणे परवडणारे नव्हते. त्याची दखल घेऊन ही वाढ केली आहे. या वाढीमुळे कामांवर काम करणाऱ्या मजुरांना २७३ रुपयांऐवजी २९७ रुपये प्रतिदिवस मजुरी मिळणार आहे. (latest marathi news)

जिल्ह्यात सुरू असलेली कामे

जिल्ह्यातील एक हजार ३८५ ग्रामपंचायतीतंर्गत ‘मनरेगा’ अंतर्गत सद्यःस्थितीत ८१० कामे सुरू आहेत. १ एप्रिल २०२३ ला जिल्ह्यातील अपूर्ण कामांची संख्या ३१ हजार ६२१ असून, यातील १६ जून २०२४ अखेर २८ हजार ५३९ कामे पूर्ण झाली आहेत.

तर तीन हजार ८२ कामे अपूर्ण आहेत. या कामांवर २६ हजार १७८ मजूर काम करत आहेत. त्यांना रोजच्या वाढलेल्या २४ रुपये वाढीव मजुरीचा विचार करता या मजुरांना प्रतिदिन मिळून सहा लाख २८ हजार २७२ रुपयांचा लाभ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT