Officials of various parties and organizations participating in the ongoing Thiya agitation at Godaghat on Saturday. esakal
नाशिक

Nashik News : जिर्णोद्धार केलेल्या पुरातन घाटांची मोडतोड नको! विविध पक्ष, संघटनांचे गोदाघाटावर ठिय्या आंदोलन

Nashik News : गोदाआरतीसाठी दुतोंड्या मारुतीजवळील कुंडात दगडी चौथरा बसविण्यासाठी शनिवारी सकाळी तेथील पायऱ्या तोडण्यास सुरवात झाल्यावर काही वेळातच त्या ठिकाणी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी पोचले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गोदाआरतीसाठी दुतोंड्या मारुतीजवळील कुंडात दगडी चौथरा बसविण्यासाठी शनिवारी (ता. ६) सकाळी तेथील पायऱ्या तोडण्यास सुरवात झाल्यावर काही वेळातच त्या ठिकाणी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी पोचले. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी जिर्णोद्धार केलेल्या प्राचीन घाटाच्या मोडतोडीबाबत ठिय्या आंदोलन पुकारत हे काम बंद पाडले.

या वेळी मोठा बंदोबस्त होता. दोन गोदा महाआरतींवरून एकीकडे वाद सुरू असतानाच शनिवारी सकाळी महाआरतीसाठी चौथरा बनविण्यासाठी रामतीर्थाशेजारील कुंडालगतच्या पायऱ्या तोडण्यासाठी पथक पोचले. या पथकाने पायऱ्या तोडण्यास सुरवात केली. ही बाब विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचताच काही वेळातच या ठिकाणी मोठ्या संख्येने गोदाप्रेमी जमा होऊन या कामास विरोध करत ठिय्या आंदोलन सुरू केले.

या वेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या वेळी गोदापात्रातील बांधकामाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणारे देवांग जानी, राजेश पंडित, निशिकांत पगारे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, प्रतीक शुक्ल, माजी नगरसेवक राजाभाऊ बागूल, कल्पना पांडे.

चंद्रशेखर पंचाक्षरी, सुनील महंकाळे, नीलेश भोरे, धनगर समाज विकास परिषदेचे बापूसाहेब शिंदे, सोनल गायधनी, अमित पंचभय्ये, सदानंद देव, अलोक गायधनी, कुमार बेळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गोदाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (latest marathi news)

न्यायालयाचा अवमान

महापालिकेकडून पूररेषेतील बांधकामांना परवानगी देताना पूररेषेच्या आतील बांधकामाबाबत नियम दाखवून विरोध केला जातो. मात्र महाआरतीच्या नावाखाली चक्क चार ते पाच दगडी चौथरा उभारण्यास मात्र लगेचच परवानगी दिली जाते.

हे अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया ठिय्या आंदोलनात सहभागी असलेल्या अनेकांनी व्यक्त केली. खरेतर पात्रातील पक्क्या बांधकामांमुळे उच्च न्यायालयाचा अवमान होतो आहे, परंतु याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनस्थळी उपस्थितांनी केला आहे.

आंदोलनाला भाजप नेत्याचे बळ?

या आंदोलनामागे भाजपमधील काही असंतुष्ट नेत्यांचा सहभाग असल्याची प्रतिक्रिया एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. खरेतर उत्तरेच्या धर्तीवर गोदावरीची महाआरती हा भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असताना भाजपमधील एक ज्येष्ठ नेता या आंदोलनाचा फूस देत असल्याचे संबंधिताने सांगितले. संबंधित व्यक्ती आगामी विधानसभेसाठी पूर्वमधून इच्छुक असून त्यानेच या आंदोलनाला बळ दिल्याचे संबंधिताने सांगितले.

"गोदाघाट सुशोभीकरणाच्या नावाखाली अहिल्यादेवी होळकर यांनी जिर्णोद्धार केलेल्या सुंदर घाटाची मोडतोड करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी पुरातत्त्व विभाग व अन्य संबंधित विभागांनी त्वरित स्थगिती द्यावी." - राजेंद्र बागूल, काँग्रेस नेते

"प्राचीन घाटांची मोडतोड एकवेळ जीव गेला तरी चालेल, परंतु ती सहन केली जाणार नाही. या ठिकाणी सिमेंटचे चौथरा बांधल्यास सिंहस्थातील शाही स्नानात अडथळा निर्माण होईल." - सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ

"गोदा आरतीस विरोध नाही, परंतु त्या नावाखाली पूररेषेत होणाऱ्या बांधकामांना विरोध आहे. पात्रातील काँक्रिटचा थर काढण्यासाठी कायदेशीर व तांत्रिक बाजूंची पूर्तता झाली आहे. मात्र त्याकडे काणाडोळा करत पायऱ्यांवर नव्याने काँक्रिटीकरणाचा घाट घातला जात आहे." - देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती

"गोदाआरतीस कोणाचाच विरोध नाही, परंतु गोदेचा नैसर्गिक प्रवाह अडविणे चुकीचे आहे. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी व गोदेचे पावित्र्यही जपण्यात यावे." - निशिकांत पगारे, याचिकाकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Mahabaleshwar Municipal Polls: महाबळेश्‍‍वरमध्‍ये राष्‍ट्रवादीने घडविला इतिहास!नगराध्‍यक्षपदासह १३ जागांवर विजय; भाजपला एक अन्..

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या 'एका' मताने विजय

Muncher Municipal Result:'मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे'; आमदार शरद सोनवणेंनी फुगडीतून व्यक्त केला आनंद..

राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष! एम.कॉम.चे शिक्षण घेणारी २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT