IG Dr. B. G. Shekhar-Patil esakal
नाशिक

Nashik News : अद्याप 2 हजार परवानाधारकांच्या पिस्तुलांची प्रतीक्षा; नाशिक परीक्षेत्रातील चित्र

Nashik : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच परवानाधारकांना त्यांच्याकडील पिस्तूल पोलिसांकडे जमा करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच परवानाधारकांना त्यांच्याकडील पिस्तूल पोलिसांकडे जमा करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. या नोटिसीनुसार नाशिक परीक्षेत्रातील सुमारे चार हजार परवानाधारकांनी त्यांच्याकडील पिस्तूल जमा केल्या असून, अद्यापही दोन हजार परवानाधारकांनी त्यांची पिस्तूल जमा केलेली नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्या महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. ()

त्यानंतर नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी परीक्षेत्रातील नाशिकसह अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या पोलिस अधीक्षक कार्यालयांना परवानाधारकांकडील अग्निशस्त्रे जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक ग्रामीण, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगरच्या अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखेने परवानाधारकांना नोटिसा बजावत त्यांच्याकडील अग्निशस्त्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस अधीक्षकांच्या विशेष शाखेकडून बजाविण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित परवानाधारकांनी त्यांच्याकडील पिस्तूल जमा करण्यास सुरवात केली. आत्तापर्यंत चार हजार पिस्तुली अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखेकडे जमा करण्यात आलेल्या आहेत. अद्यापही दोन हजार परवानाधारकांनी त्यांची पिस्तूल जमा केलेली नाही. त्यांनी ती जमा करावीत, यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष शाखेकडून पाठपुरावा सुरू आहे. (latest marathi news)

...यांना नोटिसा नाहीत

शस्त्र परवाना देण्यात आलेल्यांमध्ये शासकीय सेवेतील माजी अधिकारी, बँकांचे सुरक्षारक्षक आणि लष्करातील निवृत्त जवान असतात. या क्षेत्रातील परवानाधारक वगळून अन्य परवानाधारकांना त्यांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

अवैध तस्करांवर करडी नजर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरीत्या मद्यतस्करी होण्याची शक्यता असते. यामुळे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शेखर-पाटील यांनी नाशिक परीक्षेत्रातील सीमावर्ती भागात कडेकोट नाकाबंदी करण्याचे आदेश देत अवैध मद्यतस्करीवर करडी नजर ठेवून धडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. अवैधरीत्या वाहतूक होणारे मद्य, गुटखा, अमली पदार्थ, शस्त्र साठ्याविरोधात परीक्षेत्रामध्ये पोलिसांकडून जोरदार मोहीम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT