नाशिक

गल्ल्यांची जातीवाचक नावे बदलणार

CD
जातिवाचक रस्ते, चौकांच्या नावांना फुली महापालिकेकडून ८१ ठिकाणांची नावे बदलून गॅझेट प्रसिद्ध सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : शहरातील रस्ते, चौक, वाड्या आणि वस्त्यांना असलेली जातिवाचक नावे हटविण्याच्या मोहिमेला पुन्हा वेग आला आहे. राज्याच्या समाजकल्याण विभागाने मे २०२१ मध्ये कायदा करून अशी नावे बदलण्याचे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली आहे किंवा नाही, याची फेरतपासणी सुरू झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी जातिवाचक नाव शिल्लक नसल्याचा अहवाल आणि गॅझेट तातडीने सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने ८१ ठिकाणांची नावे बदलून गॅझेट प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेच्या समाजकल्याण विभागाने सर्वेक्षण केल्यानंतर शहरातून ८१ जातिवाचक नावांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. महासभेने त्यांना मंजुरीही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात नावे बदलताना काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध झाला होता. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव करून नावे बदलल्याचे गॅझेट प्रसिद्ध करून अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक महापालिका आता ८१ ठिकाणांचे गॅझेट प्रसिद्ध करणार आहे. ----------------- अशी आहेत गल्ल्यांची नावे (कंसात बदललेले नाव) - पूर्व विभाग : जुनी तांबट गल्ली (ओंकार लेन), कुंभारवाडा (भूमीनगर), माळी गल्ली (निसर्ग गल्ली), तेली गल्ली (रामशेज गल्ली), मातंगवाडा (स्वाभिमाननगर), राजवाडा (प्रगतीनगर), कोकणीपुरा (जनतानगर), कोळीवाडा (कौशल्यनगर), माळी गल्ली (निर्मल गल्ली), बुरूड गल्ली (यशवंत गल्ली), जोगवाडा (शरयूनगर), मुल्तानपुरा (शहीदनगर), साळी गल्ली (शांतिनगर), काझीपुरा (इन्कलाबनगर), वैदुवाडी (अहिंसानगर), आदिवासी वाडा (क्रांतीनगर), माळी गल्ली (उपासनानगर), रामोशीवाडा (सहकारनगर). ००००० पश्चिम विभाग : नवीन तांबट लेन (संस्कृती लेन), लोणार लेन (विवेक लेन), मातंगवाडा (मुक्तीवाडा), ख्रिश्चनवाडी (जयपूरनगरी), कुंभार वाडा (धरतीनगर), साळीवाडा (स्नेहनगर ), जुने तांबट लेन (चैतन्य लेन) काजीगडी (गोदागडी). ०००० पंचवटी विभाग : वैदुवाडी (पैनगंगानगर), मांगवाडा (नर्मदानगर), धनगर गल्ली (जय हिंदनगर), जोशी वाडा (रायगडनगर), तांबोळी नगर (वेदश्रीनगर), भराडवाडी (रायरेश्वरनगर), वडारवाडी (रामशेजनगर), मोठा राजवाडा (सिंधूनगर), नाथ गल्ली (आनंदीनगरी), पाथरवट लेन (कमल नयन लेन), कोमटी गल्ली (देवगिरी नगरी), भोईवाडा (जनस्थाननगर), कुंभार गल्ली (कलाकृतीनगर), चांभार गल्ली (त्रिकटकनगर), कोळीवाडा (हुतात्मानगर). ०००००० नाशिक रोड विभाग : बौद्ध वाडा (समतानगर), गोसावीनगर (आराधनानगर), गवळीवाडा (राधानगरी), बौद्धनगर (नालंदानगर), लिंगायत कॉलनी (तक्षशिला कॉलनी), गोसावीवाडी (जुईनगर), धोबी गल्ली (कल्पवृक्षनगर), महावीरनगर (रायगडनगर), जैन कॉलनी (सम्यकनगर), बौद्धवाडा (गोकुळधाम), मांगवाडा (गोवर्धननगर), धनगर गल्ली ( टायगर गल्ली), तेली गल्ली (प्रगतीनगर), भोई गल्ली (विकासनगर), वाल्मीकनगर (निर्माणनगर), कुंभार गल्ली (कुशलनगर), चांभारवाडा (क्रांतीनगर), लोहार गल्ली (कामगारनगर). ०००० सिडको विभाग : हाजीनगर (खुशबूनगर), झेनतनगर (महेकनगर), हरदास कॉलनी (गुंजन कॉलनी), भिलवाडा (सहजीवननगर), कोळीवाडा (श्रमिकनगर), कोळीवाडा (कर्मयोगीनगर), विश्वकर्मा (आविष्कारनगर). ००००० सातपूर विभाग : कोळीवाडा (गोदावरीनगर), जोशीवाडा (रायगडनगर), कोळीवाडा (सागरवाडा), कोळीवाडा (अंजनेरीनगर), माळी कॉलनी (मयूर कॉलनी), कोळीवाडा (नंदिनीनगर). -------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT