The road that has become open due to the removal of street shops. In the second photo, the municipal team in action. esakal
नाशिक

Nashik News: येवल्यात रस्त्यावरील भाजी बाजार उठवला! विंचूर चौफुली ते इंद्रनील कॉर्नरने घेतला मोकळा श्‍वास

Nashik News : गुरुवारी (ता. २२) पालिकेने विशेष मोहीम राबवून भाजीपाला व फळे विक्रेत्यांची रस्त्यावरील दुकाने हटविली.

सकाळ वृत्तसेवा

येवला : लाखो रुपये खर्चून नवीन बांधलेल्या भाजी मंडईऐवजी भाजीपाला विक्रेते व शेतकरी रस्ताच्या दुतर्फा बसत असल्याने रस्त्यावर वाहतुकीचा खेळखंडोबा होऊन थेट विंचूर चौफुलीवर महामार्गावर वाहतूक विस्कळित होते. गुरुवारी (ता. २२) पालिकेने विशेष मोहीम राबवून भाजीपाला व फळे विक्रेत्यांची रस्त्यावरील दुकाने हटविली. काही ठिकाणी जेसीबीद्वारे ओटे हटविले. या मोहिमेचे येवलेकरांनी स्वागत केले. पुन्हा दुकाने मांडू न देण्याची मागणी होत आहे. (Nashik encroachment Yeola municipality marathi news)

विंचूर चौफुलीवरील अनधिकृत फळ विक्रेते व इंद्रनील हॉटेल कॉर्नरजवळ भाजीपाला विक्रेत्यांनी महामार्गालगत मोठे अतिक्रमण केले होते. पालिकेने तयार केलेल्या ओट्यावर बसावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्याकडे विक्रेते वारंवार दुर्लक्ष करत विंचूर चौफुलीपासून इंद्रनील कॉर्नरपर्यंत बसत होते.

यामुळे नाशिक मार्गाकडून शहरात प्रवेश कसा करावा आणि केला तर आत कसे जावे, हा प्रश्न वाहनधारकांसह पादचाऱ्यांना पडतो. याचमुळे नाशिक-औरंगाबाद व मनमाड-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी होते. यापूर्वी दोन-तीन वेळेस मोहीम राबविली. मात्र, चार-पाच दिवस झाले, की पुन्हा भाजीपाला दुकानदार रस्त्यावर दुकाने थाटतात आणि वाहतूक कोंडी होते. (Latest Marathi News)

पालिकेने गुरुवारी अनधिकृत टपऱ्या व इतर साहित्य जप्त करण्याची तंबी देऊन स्वतःहून अतिक्रमण हटविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तासाभरातच दुकानांचे पाल विक्रेत्यांनी काढून घेतले. पालिकेने शहरातील सर्व भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी नवीन बाजारतळात बसून व्यवसाय करावा, अन्य ठिकाणी बसून रहदारीस अडथळा आणू नये, असे आवाहन केले आहे. यापुढे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरला! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

SCROLL FOR NEXT