धुळे ः टुडे ४ साठी.......आज मस्ट
--
तीन कॉलमासाठी फोटो क्रमांक ः 33679
नरडाणा : विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात एचपीसीएल, युनिसेडच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना दप्तरे, डेस्क वाटप करताना अध्यक्ष सत्यजित सिसोदे व मान्यवर.
--
नरडाण्यात विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले
-
पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने २७ हजारांवर विद्यार्थ्यांना दप्तर
सकाळ वृत्तसेवा
नरडाणा, ता. २७ : जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत ‘एचपीसीएल’ आणि ‘युनिसेड’तर्फे जिल्ह्यातील तब्बल २७ हजार ७७२ गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, तसेच डेस्कचे वाटप करण्यात आले. याच उपक्रमांतर्गत नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील विकास विद्यालय आणि विकास उर्दू माध्यमिक विद्यालयात ३२५ विद्यार्थ्यांना दप्तरे व डेस्क सुपूर्द करण्यात आले.
नरडाणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे युवा नेते सत्यजित सिसोदे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ समाजसेवक जिजाबराव सिसोदे, भाजपचे कार्यकर्ते गणेश मोरे, धांदरणे सोसायटीचे चेअरमन लिलाधर सोनवणे, विनीत सिसोदे, राजेश सिसोदे, उर्दू विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. वाघ, पर्यवेक्षक एस. बी. जगताप, ज्येष्ठ शिक्षक सी. के. सिसोदे, ए. ए. काळे, जी. वाय. सोनवणे, प्रा. पी. जे. पाटील यांच्यासह विकास परिवारातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष सिसोदे म्हणाले, की पालकमंत्री रावल यांच्या मार्गदर्शनात शिंदखेडा मतदारसंघात विविध शासकीय उपक्रम व लोककल्याणकारी योजना राबविण्याचा संकल्प असून, तळागाळातील नागरिकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. विद्यार्थी व शिक्षकांनी पालकमंत्री रावल यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ए. ए. काळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.