JEE Mains Exam 2024
JEE Mains Exam 2024 esakal
नाशिक

JEE Main Result : जेईई मेन्‍समध्ये चमकले नाशिकचे विद्यार्थी; आयुषचा 164 वा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा

JEE Main Result : जेईई मेन्‍स परीक्षेंतर्गत अभियांत्रिकी (बी.ई./बी.टेक.) अभ्यासक्रमासाच्‍या प्रवेशासाठी घेतलेल्‍या पेपर क्रमांक एकचा निकाल बुधवारी (ता. २४) रात्री उशिरा जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करताना जेईई ॲडव्हान्स्‍ड परीक्षेसाठी पात्रता मिळविली आहे. जिल्‍हा परिषदेने राबविलेल्‍या सुपर ५० उपक्रमांतर्गत २२ विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत विशेष कामगिरीची नोंद केली. (students of JEE main Advanced examination while good performing)

1.आयुष गजेश्‍वर, 2.भाग्‍येश कोथळकर, 3.खुशी कुचेरिया, 4.दिव्‍यांश नरखेडे, 5.कलश लुंकड.

स्‍पेक्‍ट्रमच्‍या आयुष गजेश्‍वरने राष्ट्रीय क्रमवारीत १६४ वा क्रमांक पटकावत नाशिकमध्ये अव्वल स्‍थान राखले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासाठी नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे जेईई मेन्‍सच्‍या दोन सत्रांचे आयोजन केले होते. त्‍यानुसार २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत, तर ४ ते ९ एप्रिलदरम्‍यान परीक्षा पार पडली होती.

इंग्रजी, मराठीबरोबर विविध १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. राष्ट्रीय पातळीवर तसेच परदेशातील विविध केंद्रांवर ही परीक्षा सुरळीतरीत्या पार पडली. दोन्‍ही सत्रांतील कामगिरीच्‍या आधारे जेईई मेन्‍स परीक्षेतील पेपर क्रमांक एकचा अंतिम निकाल जाहीर केला आहे.

‘स्‍पेक्‍ट्रम’चे आयुष, खुशीचा नाशिकमध्ये अव्वल क्रमांक

‘स्‍पेक्‍ट्रम’च्‍या आयुष गजेश्‍वर (९९.९९ पर्सेंटाईल) आणि खुशी कुचेरिया (९९.९८ पर्सेंटाईल) यांनी नाशिकच्‍या स्‍तरावर अव्वल स्‍थान राखले आहे. ‘स्‍पेक्‍ट्रम’च्‍या ४० विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईल आणि शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी ९७ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळविले. आयुष व खुशीने भौतिकशास्‍त्रात, भाग्‍येश कोथळकरने रसायनशास्‍त्रात आणि कलश लुंकडने गणितात शंभर पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत.

यशस्‍वी विद्यार्थ्यांमध्ये भाग्‍येश कोथळकर (९९.९८), दिव्‍यांश नारखेडे (९९.९५), कलश लुंकड (९९.९२), आदित्‍य देवरे (९९.८६), अंकित सहा (९९.८४), अपूर्व रोहम (९९.७९), मंथन कोठावदे (९९.७६), अथर्व चौबे (९९.७४) यांनी यश मिळविले. साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी जेईई मेन्‍समध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यशस्‍वी विद्यार्थ्यांचे कपिल जैन यांनी अभिनंदन केले.(latest marathi news)

वृषाली वाघमारे डिंपल बागूल

‘रेजोनन्स’च्या समीराचा ९९.९७ पर्सेंटाईल

येथील ‘रेजोनन्‍स’च्‍या समीरा पांडा हिने ९९.९७४ पर्सेंटाईल मिळविले. तसेच, अनिरुद्ध महापात्रा (९९.९४), सोहम डोखळे (९९.९१), मंदार देशमुख (९९.८१), प्रणव पवार (९९. ५९), संकल्प जोशी (९९. ५२), सिद्धी बोरसे (९९.४९), आशिष शेवाळे (९९.०१) यांनी घवघवीत यश मिळविले. इतर पाच विद्यार्थ्यांना ९८ पर्सेंटाईलहून अधिक गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांना स्वप्नील जैन, मनीष शंकर, शिवाजी भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

सुपर ५० उपक्रमांतर्गत २२ विद्यार्थी उत्तीर्ण

जिल्हा परिषदेतर्फे २०२२-२३ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून सुपर ५० उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची परीक्षेद्वारे निवड केली होती. या विद्यार्थ्यांना जेईई व जेईई ॲडव्हान्स परीक्षांसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण दिले होते. दोन वर्षांच्या कठोर परिश्रमातून २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्‍स परीक्षेत यश मिळविले आहे. यात १२ विद्यार्थी व दहा विद्यार्थिनींचा समावेश आहे. सुपर ५० उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधून वृषाली वाघमारे हिने अव्वल क्रमांक राखला. डिंपल बागूल हिनेही चमकदार कामगिरी केली आहे.

जळगावच्‍या अर्चितला मिळाले १०० पर्सेंटाईल

जेईई मेन्‍सच्‍या निकालात देशभरातील ५६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यात जळगाव येथील अर्चित राहुल पाटील याचाही समावेश आहे. अर्चित हा शालेय जीवनापासूनच सक्रिय राबलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT