bridge of Nandurmadhmeshwar esakal
नाशिक

Nashik News : नांदूरमधमेश्वरच्या खालच्या पूलावर स्टंटबाजी! जीव धोक्यात घालून पूराच्या पाण्यासोबत सेल्फीची धडपड

Nashik News : गोदावरी व दारणा नदीतील पाण्याचा नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरु झाल्यानंतर पहिल्या पूराच्या पाण्यासोबत सेल्फीच्या प्रेमात पडलेली तरुणाईचा सेल्फीचा आत्मघातकी खेळ पहायला मिळू लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

निफाड : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर नाशिक तालुक्यातील पावसामुळे धरणातून विसर्ग सुरु झाला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा ८८०४ क्युसेस विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरु झाल्याने पहिला पूर पहाण्यासाठी धरणाखालच्या पूलावर धोकेधायक सेल्फी काढत स्टंटबाजी वाढली आहे. (Nashik Stunts on lower bridge of Nandurmadhmeshwar)

गोदावरी व दारणा नदीतील पाण्याचा नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरु झाल्यानंतर पहिल्या पूराच्या पाण्यासोबत सेल्फीच्या प्रेमात पडलेली तरुणाईचा सेल्फीचा आत्मघातकी खेळ पहायला मिळू लागला आहे. येणारे पर्यटक स्टंटबाजी करत, जीव धोक्यात घालून पुलावर उभे राहून सेल्फी काढत असल्याचे दिसते.

त्यामुळे सेल्फीची स्टंटबाजी करणाऱ्यासह आणि सेल्फीप्रेमींवर कडक कारवाईची मागणी होत आहे. सध्या पोलिसांचा बंदोबस्त दिसून येत नाही. सुरक्षा रक्षक आणि पोलीस नसल्याने दारुच्या नशेतील बेधुंद पर्यटक पूराच्या पाण्याच्या तसेच धरणाच्या किनाऱ्यावर तसेच पुलावर उभे राहून जीवघेणी स्टंटबाजी करत असतात. (latest marathi news)

"गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पूर पाणी पाहण्यासाठी नागरिक पर्यटक हौशी तरुण नांदूरमध्यमेश्वर धरणाकडे गर्दी करु लागले आहे. धरणाखालच्या पुलावर सेल्फी बहाद्दर धोकादायक पद्धतीने सेल्फी काढत असल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करायला हवी."- खंडू बोडके पाटील (करंजगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT