sub inspector of police at Vani police station celebrated his birthday by cutting cake with illegal traders  esakal
नाशिक

Nashik News : अवैध धंदेवाल्यांसमवेत पोलिस ठाण्यातच कापला केक! पोलिस उपनिरीक्षकाच्या वाढदिवसामुळे वणी पोलिसांच्या प्रतिमेस तडा

Nashik News : वणी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकाने अवैध धंदेवाल्यांसमवेत केक कापून आपला वाढदिवस साजरा केल्याने वणी पोलिस ठाण्याची कार्यशझली चर्चेत आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वणी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकाने अवैध धंदेवाल्यांसमवेत केक कापून आपला वाढदिवस साजरा केल्याने वणी पोलिस ठाण्याची कार्यशझली चर्चेत आली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाने गांभीर्याने दखल घेत पोलिस उपनिरीक्षक विजय कोठावळे यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Nashik News)

परिसरातील अवैध दारूतस्करांनी उपनिरीक्षक कोठावळे यांचा वाढदिवस वणी पोलिस ठाण्यामध्ये साजरा तर केलाच शिवाय सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करून आपले हितसंबंध आणि वजन दाखविण्याचा एकप्रकारे प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे पोलिस खात्याची प्रतिमा डागाळली आहे.

याबाबत समाज माध्यमांमध्ये सचित्र माहिती प्रसारित झाल्याने ग्रामीण पोलिस दलासह वणी पोलिसांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस ठाण्यात वाढदिवस साजरा करणाऱ्यांतील काही जणांवर मद्य विक्री, तसेच तस्करीबाबत गुन्हे दाखल आहेत. या घटनेने पोलिस व अवैध मद्य विक्री व तस्करांचे लागेबांधे असल्याचे अधोरेखित झाले आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पोलिस ठाण्यातच नियंत्रण नसल्याचे उघड झाले आहे. (latest marathi news)

डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या आदेशाचा विसर...

काही अधिकारी व अंमलदार पोलिस ठाण्यांमध्ये वा कार्यालयात आपले वाढदिवस सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरे करतात. वाढदिवस साजरे करताना बऱ्याच वेळा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्ती, मद्य, मटका व इतर अवैध धंदा करणारे असल्याचे, तर काही एजंटगिरी करणारे लोकही सहभागी होत असल्याचे प्रकार समाज माध्यमातून सामोरे येतात.

या सर्व प्रकारामुळे पोलिस खात्याची प्रतिमा डागाळली जाऊन समाजामध्ये एक वेगळाच संदेश जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांबद्दल मोठ्या प्रमाणावर नाराजी तयार होत आहे. वाढदिवस ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे पोलिसांनी आपला वाढदिवस पोलिस ठाण्यात सार्वजनिकरीत्या साजरा न करता घरीच साजरा करावा.

असा आदेश तत्कालीन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी दिला होता. मात्र ते निवृत्त होताच त्यांच्या आदेशाचा पोलिस अधिकाऱ्यांना विसर पडल्याचे व कानाडोळा केल्याचे वणी पोलिस ठाण्यात झालेल्या प्रकारामुळे पुढे आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT