Anil Dalvi, Yash Mahajan, Suraj Tidke, Avinash Thorat, Vaibhav Damale esakal
नाशिक

Nashik Success Story : कळवणचा अनिल दळवी सहाय्यक गटविकास अधिकारी

Nashik Success Story : सुकापूर (ता. कळवण) येथील अनिल दळवी याने बाभूळगाव येथील एसएनडी कृषी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले.

सकाळ वृत्तसेवा

येवला : सुकापूर (ता. कळवण) येथील अनिल दळवी याने बाभूळगाव येथील एसएनडी कृषी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. त्याची सहाय्यक गटविकास अधिकारी किंवा शिक्षण अधिकारीपदावर लवकरच नियुक्ती होणार आहे. बाभूळगाव येथील एसएनडी शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे देण्यासह यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला जातो. (Nashik Success Story Anil Dalvi of Kalvan became Assistant Group Development Officer)

त्याचाच परिपाक म्हणजे यंदाही एकावेळी पाच विद्यार्थ्यांना विविध पदांवर नोकरी मिळाली आहे, असे प्राचार्य डॉ. दिनेश कुळधर यांनी सांगितले. महाविद्यालयात मागील वर्षी पदवी मिळविलेल्या कन्नड तालुक्यातील यश महाजन, बीड जिल्हातील सूरज तिडके यांची कृषी सेवक (ठाणे), चांदवड तालुक्यातील अविनाश थोरात यांची कृषी सेवक (नाशिक) पदावर निवड झाली आहे.

याशिवाय वैभव ढमाले यांची भारतीय सैन्य दलात वैद्यकीय सहाय्यक पदावर निवड झाली आहे. महाविद्यालयीन जीवनातील अभ्यास व चिकाटीच्या जोरावर यश मिळवू शकलो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. (latest marathi news)

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष तथा आमदार किशोर दराडे, सरचिटणीस कुणाल दराडे, कार्यकारी संचालक रुपेश दराडे, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, सहाय्यक अधिकारी सुनील पवार, कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. व्ही. डी. शेंडे, प्राचार्य डॉ. कुळधर, डॉ. एस. डी. म्हस्के आदींनी अभिनंदन केले.

"आमच्या संकुलात प्रवेश घेतल्यापासूनच विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले जाते. स्पर्धा परीक्षेच्या टीप्स, मुलाखत तंत्रासाठी मार्गदर्शनासह व्याख्याने घेतली जातात. यामुळे दरवर्षी ‘जगदंबा’- ‘मातोश्री’चे हजारो विद्यार्थी शासकीय-निमशासकीय सेवेत नोकरीला लागतात. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यशही कौतुकास्पद आहे."-किशोर दराडे, शिक्षक आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT