Dozens of medal winners Anushka Ambekar and Sanskriti Shingade practice sailing in the Kadava River. esakal
नाशिक

Success Story: नौकानयन स्पर्धेत अनुष्का - संस्कृतीची डझनभर पदकाची कमाई! ध्येय गाठण्यासाठी प्रतिकुल परिस्थितीशी अविरत संघर्ष

Nashik News : एखादा निश्‍चय केला आणि ते ध्येय गाठण्यासाठी परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी काहीजण माघारी फिरत नाही.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगांव बसवंत : एखादा निश्‍चय केला आणि ते ध्येय गाठण्यासाठी परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी काहीजण माघारी फिरत नाही. उलट जिद्दीने लढून लक्ष्याचा पाठलाग करतात. पिंपळगाव बसवंत महाविद्यालयातील अनुष्का आंबेकर व संस्कृती शिंगाडे या दोन विद्यार्थींनिंनी प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करीत शिक्षणाबरोबर सरावात सातत्य ठेवल्याने नौकानयन स्पर्धेत डझनभर पदकांची कमाई केली आहे. (Nashik Success Story Anushka Sanskriti wins medals in sailing news)

कोकणगाव (ता. निफाड) येथील संस्कृती सोमनाथ शिंगाडे पिंपळगाव महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिक्षण घेते. संस्कृतीच्या घरची आर्थिक परिस्थिती तर बेताची आहे. त्यात दोन वर्षापूवी कोविडच्या थैमानात संस्कृतीची आई वृषाली शिंगांडे यांचे निधन झाले. वडील, भाऊ व स्वत: संस्कृती असे तिघांचेच कुटुंब आहे. घरातील स्वयंपाक करून दररोज सकाळी सहा वाजता संस्कृती कादवा नदीत नौकानयनच्या सरावासाठी जाते.

संस्कृतीसमवेत अनुष्का आंबेकर देखील सराव करते. वडील संतोष आंबेकर हे अनुष्काला नौकानयन क्रीडा प्रकारासाठी सातत्याने प्रोत्साहीत करतात. आंबेकर हे शिलाईकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. संस्कृती व अनुष्काचे नौकानयन खेळातील कौशल्य पाहून क्रीडाशिक्षक प्रा. हेमंत पाटील देखील प्रभावीत झाले. (latest marathi news)

प्रा. पाटील यांनी दोघींना मार्गदर्शन करण्यास सुरवात केली आहे. सात वर्षाचे परिश्रम आता फळाला येत आहे. महाराष्ट्र संघाकडून खेळताना भारतात झालेल्या सी १-२ नौकानयनच्या महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये पाच सुवर्णपदके, राष्ट्रीय स्पर्धेत ब्रांझ मेडल, राज्यस्तरीय सहा सुवर्णपदके, युनिव्हर्सलसाठी दोन सिल्व्हर व ब्रांझ मेडलची कमाई केली आहे. चमकदार कामगिरी करून संस्कृती व अनुष्का आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामन्यात पदकांना गवसणी घालण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT