Prakash Mahale, Ramchandra Patil felicitating Yatin Patil after securing a place in the selection list of State Services Main Examination-2022.
Prakash Mahale, Ramchandra Patil felicitating Yatin Patil after securing a place in the selection list of State Services Main Examination-2022. esakal
नाशिक

Nashik Success Story : अपयशाचा सामना करत अखेर यशाला गवसणी; चारवेळा ‘MPSC’त अपयशी यतीन झाला उपजिल्‍हाधिकारी

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा

Nashik Success Story : अपयश पचवायची क्षमता असेल, तर यशस्‍वी होण्यापासून आपल्‍याला कुणीही रोखू शकत नाही, ही बाब यतीन रमेशचंद्र पाटील याने सिद्ध करून दाखविली आहे. यापूर्वी दोनवेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत, तर चारवेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारूनही अपयश आले. तरी त्‍यातून खचून न जाता जिद्द, चिकाटी अन्‌ अभ्यासातील सातत्याच्या जोरावर यतीनने अभ्यास सुरू ठेवला. (Nashik Success Story Deputy District Magistrate marathi news)

अखेर राज्‍यसेवा २०२२ साठी उपजिल्‍हाधिकारी पदासाठीच्‍या निवड यादीत त्‍याला स्‍थान मिळाले आहे. मूळचा जळगावच्‍या यतीन पाटीलचे वडील रमेशचंद्र पाटील भोसला शाळेत शिक्षक, तर आई विमल पाटील गृहिणी आहेत. यतीनचे शालेय शिक्षण मराठा हायस्‍कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षक आरवायके विज्ञान महाविद्यालयात झाले.

गणित विषयात बी.एस्सीचे शिक्षण घेतल्‍यानंतर त्‍याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या गणित विभागातून एम.एसस्सी. ही पदव्‍युत्तर पदवी प्राप्त केली. यानंतर सेट-नेट परीक्षांमध्ये यश मिळविल्‍यानंतर सहाय्यक प्राध्यापक पदावर खासगी शैक्षणिक संस्‍थेत नोकरीला सुरवात केली. मात्र प्रशासकीय सेवेत जाऊन समाजसेवा करण्याचे कुठेतरी मनात दृढ निश्‍चय त्‍याने केला होता.  (latest marathi news)

नोकरी सोडत स्‍पर्धा परीक्षांची तयारी

सहाय्यक प्राध्यापक पदाची नोकरी सोडून यतीनने स्‍पर्धा परीक्षांच्‍या तयारीला सुरवात केली. कुठलाही क्लास न लावता स्‍वयंअध्ययनाच्‍या जोरावर त्‍याने सराव सुरू केला. यादरम्‍यान दोनवेळा यूपीएससी मुख्य परीक्षेत यश मिळविताना निवड होऊ झाली नाही. चारवेळा ‘एमपीएससी’ परीक्षेच्‍या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली.

पण तरीही अपयश आले. कोरोनाकाळातही तयारीत सातत्‍य ठेवताना अखेर राज्‍यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये त्‍याने यशाला गवसणी घातली. संपूर्ण तयारी स्‍वयंअध्ययनातून करताना मुलाखतीसाठी डॉ. अजित काकडे यांचे मार्गदर्शन मिळाल्‍याचे यतीनने सांगितले.

''अपयश पचवायची सवय नसल्‍याने अनेक जण नैराश्‍यात जातात. माझेही सुखवस्‍तू असताना परीक्षांत आलेल्‍या अपयशामुळे काहीसा तणावग्रस्‍त झालो होतो. परंतु धेय्यापासून लक्ष विचलित न होऊ देता तयारी केली आणि यशस्‍वी झालो. परीक्षा असो किंवा आयुष्य संधी येत राहणार आहेत. प्रत्‍येकाने अपयश स्‍वीकारले व ते पचवायला शिकले पाहिजे.''- यतीन पाटील, राज्‍यसेवा परीक्षा उत्तीर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT