Sudhakar Badgujar esakal
नाशिक

Sudhakar Badgujar : पैसे वाटणाऱ्यांना चोपून काढा : सुधाकर बडगुजर

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुढील चार दिवस अत्यंत महत्त्वाचे असून, महायुतीचे लोक पैशांचा वापर करण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुढील चार दिवस अत्यंत महत्त्वाचे असून, महायुतीचे लोक पैशांचा वापर करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये १९ बॅगा भरून पैसे आणले आहेत. त्यांचे लोक हे पैसे वाटताना दिसले तर पोलिसांकडे, निवडणूक निरीक्षकांकडे थेट तक्रार करा आणि एवढे करूनही ऐकत नसतील तर थेट चोपून काढा. (Sudhakar Badgujar)

अशा सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाचे बूथप्रमुख व पदाधिकाऱ्यांचा मेळावा गुरुवारी (ता. १६) नाशिकच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात झाला. या वेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावित, महानगरप्रमुख विलास शिंदे, संजय चव्हाण, बाळासाहेब वाघ, भास्कर जाधव, सचिन मराठे, देवानंद बिरारी, डी. जी. सूर्यवंशी उपस्थित होते. सुधाकर बडगुजर म्हणाले, की नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच एवढी रसद एखाद्या उमेदवाराला पुरवली गेली असेल.

पैशांच्या बळावर हे सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, आपण निष्ठावान म्हणून प्रामाणिकपणे काम करा. विरोधकांकडून पैशांचे आमिष दाखविले जाऊ शकते. पैसे घेऊन काम करणारे काही लोक डोळ्यांसमोर आहेत. पण, आपण सर्वजण खुद्दार आहोत. राजाभाऊ वाजे म्हणजे आपण स्वत: उमेदवार असल्यासारखे प्रामाणिकपणे काम करा, असे आवाहन बडगुजरांनी केले. (latest marathi news)

पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने पैसे वाटणारा आढळला तर आमच्यापैकी कुणालाही फोन करा. त्याचे फोटो, व्हिडिओ जपून ठेवा. अगोदर त्यांना समजावून सांगा. तरीही ऐकले नाही तर चोपून काढा, असा थेट इशारा बडगुजरांनी दिला.

... त्या रात्री ‘घेऊ’ नका ः गायकवाड

मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा भडीमार होऊ शकतो. त्यामुळे कार्यकर्ते रात्रभर जागरण करतात आणि सकाळी नऊ ते साडेनऊला बूथवर पोहोचतात. त्यामुळे मतदानावर परिणाम होतो. बूथप्रमुखांनी रात्रभर जागरण करू नये. शक्यतो त्या रात्री ‘घेऊ’ नका, म्हणजे सकाळी उठायला त्रास होणार नाही, अशी सूचना दत्ता गायकवाड यांनी करताच, सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT