नाशिक

नाशिक साखर कारखान्याचे ४.५० कोटींचे पेमेंट नोव्हेंबरअखेर

CD
नाशिक साखर कारखान्याचे ४.५० कोटींचे पेमेंट नोव्हेंबरअखेर माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या मध्यस्थीला यश; शेतकरी, कामगार आणि पुरवठादारांना दिलासा सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता.१४ : नाशिक सहकारी साखर कारखाना संचलित अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल एनर्जी लिमिटेडकडून शेतकरी, कामगार आणि पुरवठादारांचे थकीत सुमारे साडेचार कोटी रुपयांचे पेमेंट नोव्हेंबरअखेर अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीचे संचालक राजेराम घावटे यांनी यासंदर्भातील धनादेश माजी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पेमेंटचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. कारखान्याचा २०२५-२६ चा गळीत हंगाम पुणे येथील राजगंगा कंपनीने चालविला होता. या हंगामातील शेतकऱ्यांचे सुमारे चार कोटी, कामगारांचे एक कोटी आणि पुरवठादारांचे ५० लाख रुपये थकीत होते. यासाठी वारंवार आंदोलने आणि बैठका झाल्या. दरम्यान, ६ नोव्हेंबरला गोडसे यांनी शेतकऱ्यांना ५८ लाख रुपयांचे वैयक्तिक पेमेंट केले होते. त्याच बैठकीत १४ नोव्हेंबरला घावटे यांच्या कारखान्यावर मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शेतकरी, कामगार, माजी खासदार गोडसे, कंपनीचे संचालक राजेराम घावटे आणि माजी आमदार राहूल मोटे यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या उसाचे थकीत पेमेंट तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी आक्रमकपणे मांडली. कृती समितीचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे आणि कामगार युनियनचे अध्यक्ष शिवाजी गायधनी यांनीही कामगार व पुरवठादारांची देणी देण्याची मागणी केली. चर्चेनंतर १३ नोव्हेंबरला ५० लाख रुपये अदा करण्यात आले असून, १५ नोव्हेंबरला दीड कोटी, २१ नोव्हेंबरला एक कोटी आणि २८ नोव्हेंबरला एक कोटी रुपये देण्याचे धनादेश गोडसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे नोव्हेंबरअखेर सर्व संबंधितांचे थकीत पेमेंट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या वेळी शंकरराव ढिकले, अनिल ढिकले, सुनील गायधनी, कैलास टिळे, शिवाजी गायधनी, अनिल गायधनी, अरुण घुगे, मोतिराम जाधव, संतोष निकम, धनाजी झनकर, सुनीत गोडसे, उल्हास जाधव, भगवान सानप, शिवाजी आडके, शिवाजी बोडके, दिनेश नागरे, कचरू साळवे, दिलीप मळेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

Latest Marathi News Live Update: जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Election Commission: उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार? काय आहे अपडेट?

Kartiki Ekadashi 2026 : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरच्या विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; 'या' वेळेस फक्त काही मिनिटेच मिळणार दर्शन!

SCROLL FOR NEXT