मयूर विनायक खरोटे sakal
नाशिक

नाशिक : नामपूरला तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

खरोटे कुटुंबीयांवर आयसीआयसीआय बँकेचे सुमारे साडेदहा लाख रुपयांचे कर्ज आहे

सकाळ वृत्तसेवा

नामपूर : येथील तरुण शेतकऱ्याने तीन वर्षांपासूनची नापिकी, पिकविम्याच्या नावाखाली खासगी बँकांकडून होणारी लूट, शेतमालाचे कोसळलेले भाव, शेतमालाचे नुकसान, शेतीमधून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने नैराश्याला कंटाळून विषारी औषध सेवन करीत जीवनयात्रा संपविली. मयूर विनायक खरोटे (पोतदार) (वय ४२) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

सटाणा रस्त्यालगत मयूर फर्निचर मॉलसमोर सामाजिक कार्यकर्ते विनायक खरोटे यांची सुमारे पाच एकर सामाईक शेती आहे. त्यांना मयूर व गणेश अशी दोन मुले. दोन्ही मुलांचे विवाह झाल्यानंतर त्यांनी दोघांना सारखी शेती वाटप करून दिली. त्यानुसार अनेक वर्षांपासून मयूर खरोटे पूर्णपणे शेती पाहत होते. दोन- तीन वर्षांपासून द्राक्षाला भाव नसल्याने शेतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. एका खासगी कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पीकविमाही काढला होता. परंतु, अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेचे नुकसान होवूनही खरोटे कुटुंबाला नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या परिवाराची आर्थिक घडी विस्कटली.

खरोटे कुटुंबीयांवर आयसीआयसीआय बँकेचे सुमारे साडेदहा लाख रुपयांचे कर्ज आहे. तसेच, यंदाही हंगामात डाळिंबाच्या पिकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे शनिवारी (ता. ९) दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली.जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

Mumbai Crime: प्रेयसीने ब्रेकअप केलं, तरुणाचा संताप अनावर, भररस्त्यात तरुणीला गाठलं अन्...; मुंबईत काय घडलं?

Dabhol beach dolphin rescue : डोल्फिन मासा दिशा भटकला अन् आला किनाऱ्यावर, नंतर तरूणांनी जे केलं आश्चर्यकारक, ग्रामस्थही म्हणाले...

Property Card Scheme: राज्यातील मालमत्ताधारकांसाठी खुशखबर! नागरिकांना मिळणार मिळकतपत्रिका; काेणत्या दहा जिल्ह्यात राबतेय याेजना..

Chandrapur Crime : 5 हजार रुपयांचं विष अन् खाकी वर्दीला काळिमा! प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून मिल्कशेक पाजून लेकीनंच पोलिस बापाला संपवलं

SCROLL FOR NEXT