नाशिक

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांच्या आत्महत्त्या

CD
वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांच्या आत्महत्या सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. पहिल्या घटनेत अमोलसिंग रमेशसिंग परदेशी (४१, रा. जानकी हाईटस्‌, चार्वाक चौक, इंदिरानगर) यांनी रविवारी (ता. १) पहाटे साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. भाऊ सागर परदेशी यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, मृत घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली असून, हवालदार हारपडे हे तपास करीत आहेत. दुसरी घटना पेठ रोड परिसरातील घडली. आकाश दीपक काथवटे (३३, रा. अक्षर निसर्ग अपार्टमेंट) यांनी रविवारी (ता. १) सकाळी राहत्या घरात गळफास घेतला. श्रीकांत भोई यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तर तिसरी घटना नेहरू चौकातील जुन्यात वाड्यात घडली. हर्षद मनोज साळवेकर (५६, रा. कानडे मारुती लेन, जुने नाशिक) यांनी रविवारी (ता. १) पहाटे वेलदे वाड्यात नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. पुतण्या हिमांशू बर्वे यास सकाळी साडेआठच्या सुमारास सदर घटना समजली आणि त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात नोंद झाली आहे. हवालदार गांगुर्डे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : गोकुळ अध्यक्ष निवडीचा पेच मिटला! हायकोर्टाच्या सर्किट बेंचचा महायुतीला मोठा दणका, 'या' तारखेला होणार निवडणूक, सतेज पाटलांच्या 'समविचारी'ला दिलासा!

महापालिकेनंतर आता ठाणे जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी! पोलिसांची धावाधाव संपूर्ण कोर्ट रिकामे; परिसरात खळबळ

तुमच्याच आवडीच्या मालिकेला पुरस्कार देऊन टाकायचे ना! 'तारिणी' मालिकेला डावललं; ‘झी मराठीवर प्रेक्षक संतापले, म्हणतात-

Latest Marathi News Live Update : अमरावतीत थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचं अनोखं तेरवी आंदोलन

५०० मीटर परिसरातील सोसायट्यांना दिलासा, वाहनतळांवर रहिवाशांना ५० टक्के सवलत; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT