Sula Fest 2020 is crowded with national and international music lovers. (archived photo) esakal
नाशिक

Nashik: 'सुला फेस्‍ट'चे 5 वर्षांच्‍या प्रतीक्षेनंतर पुनरागमन! फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजन; सुला विनियार्डस्‌तर्फे नियोजनाला सुरुवात

Latest Nashik News : फेस्‍टच्‍या आयोजनासंदर्भात सुला विनियार्डस्‌तर्फे 'सेबी'ला कळविले असल्‍याने याबाबत स्‍पष्टता आली आहे. या महोत्‍सवानिमित्त नाशिकच्‍या पर्यटन क्षेत्राला बळ मिळण्यासह स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील संगीत महोत्‍सव असलेल्‍या 'सुला फेस्‍ट' चे तब्‍बल पाच वर्षांनंतर पुनरागमन होत आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये या संगीत महोत्‍सवाचे आयोजन केले जाईल. फेस्‍टच्‍या आयोजनासंदर्भात सुला विनियार्डस्‌तर्फे 'सेबी'ला कळविले असल्‍याने याबाबत स्‍पष्टता आली आहे. या महोत्‍सवानिमित्त नाशिकच्‍या पर्यटन क्षेत्राला बळ मिळण्यासह स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. (Sula Fest 2025 Returns After 5 Years)

देशातील आघाडीची वाइन उत्‍पादक कंपनी सुला विनियार्डस्‌ने नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील संगीत महोत्‍सव 'सुलाफेस्‍ट'च्‍या आयोजनास सुरुवात केली. २०२० पर्यंत सुला विनियार्डस्‌तर्फे विनाखंड सुला फेस्‍ट महोत्‍सवाचे आयोजन केले जात होते.

परंतु, यादरम्‍यान आलेल्‍या कोरोना महामारीमुळे या महोत्सवाच्या आयोजनात खंड पडला. २०२१ मध्ये सुलातर्फे या फेस्‍टचे आयोजन रद्द केले असल्‍याची घोषणा केली होती. कोरोनाची लाट ओसरल्‍यानंतरही हा महोत्‍सव विविध कारणांनी पुन्‍हा सुरु होऊ शकला नव्‍हता.

यादरम्‍यान डिसेंबर २०२२ मध्ये सुला विनियार्डस्‌ कंपनीने आयपीओच्‍या माध्यमातून शेअर बाजारात धडक घेतली होती. अशात या महोत्‍सवाला पुन्‍हा सुरुवात करण्यात यावी, अशी संगीतप्रेमींची मागणी होती. या पार्श्वभुमीवर सुला विनियार्डस्‌तर्फे सकारात्‍मक निर्णय घेतला असून, याबाबत 'सेबी' ला कळविले देखील आहे. त्‍यामुळे २०२० नंतर थेट चार वर्षांच्‍या खंडानंतर आता फेब्रुवारी २०२५ मध्ये महोत्‍सव पार पडणार आहे. (latest marathi news)

दिग्‍गज कलावंतांची असेल मांदियाळी

सुला फेस्‍ट या दोन किंवा तीन दिवसांच्या संगीत महोत्‍सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलावंतांचे सादरीकरण होते. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे आंतरराष्ट्रीय कलावंतांपैकी भारतातील पहिले सादरीकरण असणाऱ्या कलावंतांना या व्‍यासपीठावरुन संगीतप्रेमींसोबत अवगत केले जाते.

याशिवाय भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्‍गज कलावंतांचेही सादरीकरण संगीतप्रेमींच्‍या आकर्षणाचा केंद्र ठरते. पुनरागमन करत असताना, दिग्‍गज कलावंत आणण्याची तयारी सुला विनियार्डस्‌ प्रशासनातर्फे सुरु असल्‍याचे समजते.

स्‍थानिक अर्थकारणाला बुस्‍ट

सुला फेस्‍टनिमित्त राज्‍यातून व देश-विदेशातून पर्यटक, संगीतप्रेमी नाशिकमध्ये दाखल होत असतात. त्‍यामुळे नाशिक शहर व सभोवतालच्‍या क्षेत्रात हॉटेल व्‍यवसायाला बुस्‍ट मिळतो. याशिवाय पर्यटकांकडून नाशिक भ्रमंती घडत असल्‍याने येथील पेट्रोलपंप व्‍यवसायापासून अन्‍य विविध व्‍यवसायांना प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्षपणे व्‍यवसाय वृद्धीची संधी मिळते. सुला फेस्‍टचे पुनरागमन होत असल्‍याने हॉटेल क्षेत्राशी निगडीत व्‍यावसायिकदेखील सुखावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT