Summer Health Care esakal
नाशिक

Summer Health Care Tips : उन्हाळ्यात शरीरातील पाणी टिकविणे महत्त्वाचे! अशी घ्या आरोग्याची काळजी

Health Care : उन्हाळ्यात शरीर घामाघूम होत असल्याने शरीरातील पाणी कमी होऊन घशाला सतत कोरड पडते.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : तालुक्यासह शहराचे तापमानात आता वाढ झाली आहे. ग्रामीण भागातही उन्हाचा तडाखा जाणू लागला आहे. शाळा आता सकाळी सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी सकाळीच्या प्रहरी कामे उरकत आहेत. दुपारी कडक ऊन असल्याने पशुधनासह अनेक नागरिक सावलीचा आसरा घेत आहेत. शरीरातील पाणी टिकविणे गरजेचे आहे. मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. (nashik Summer Health Care marathi news)

वाढत्या तापमानाचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. उन्हाळ्यात शरीर घामाघूम होत असल्याने शरीरातील पाणी कमी होऊन घशाला सतत कोरड पडते. पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊन डिहायड्रेशनचा धोका वाढतो.

शरीरातील अंतर्गत तापमान नियंत्रण गमावल्यामुळे उष्णतेचा कॅम्प्स, उष्मा, थकवा, उष्माघात आणि उष्णतेमुळे हायपरथर्मिया यासह विविध आजार होऊ शकतात. यासाठी शरीरातील पाणी टिकविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढत्या तापमानात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा, अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि हीटस्ट्रोक यांचा समावेश असतो. याशिवाय त्वचेसंदर्भात समस्याही उद्भवतात.

असा करा उन्हापासून बचाव..

-सुती कपड्यांचा वापर करावा

-घराबाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपीचा वापर करावा

-भरपूर पाणी प्यावे.

-पाण्यासह ताक, लस्सी, लिंबू सरबत यासारख्या द्रवरूप पदार्थांचे सेवन करावे

-हवा खेळती राहावी, यासाठी खिडक्या व दारे उघडी ठेवा

खालील गोष्टी टाळा

-उन्हात अधिक श्रमाचे काम करू नका

-तातडीचे काम असल्याशिवाय दुपारी घराबाहेर पडू नका

-अतिकष्टाची कामे टाळा

-उघड्यावरील, बाहेरचे पदार्थ खाऊ नका

-शिळे अन्न खाणे टाळा

-फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले अन्नपदार्थ खाऊ नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT