Nashik Summer Heat esakal
नाशिक

Nashik Summer Heat : सूर्यनारायण कोपले; 42 अंश तापमानाची नोंद

Nashik News : शहरात कमाल ४२ अंश सेल्सिअस तर किमान २६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुपारच्या सुमारास सूर्य आग ओकत असताना, दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे दमटपणा वाढला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बुधवारी (ता. २२) शहरात कमाल ४२ अंश सेल्सिअस तर किमान २६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुपारच्या सुमारास सूर्य आग ओकत असताना, दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे दमटपणा वाढला होता. यामुळे वातावरणात उष्मा कायम असल्याने उकाड्यात वाढ झाली होती. पुढील आठवडाभर उष्णतेत वाढ होईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे.

बुधवारी नागरिक दिवसभर उष्णता जाणवत असताना सायंकाळीही घामाच्या धारा पुसत होते. दुपारी शहरातील रस्त्यांवर देखील उष्णतेचा परिणाम दिसून आला. सकाळी अकरानंतर सायंकाळपर्यंत शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदीचे चित्र पाहायला मिळाले. हे तापमान यंदाचे सर्वाधिक तापमान असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

यातही अजून उष्मा वाढल्याची शक्यता वर्तवली गेली असल्याने नाशिककरांना अजून काही दिवस या उष्णतेशी झुंजावे लागणार आहे. (latest marathi news)

बुधवारी दिवसभर नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले असताना रात्रीदेखील त्यांना उकाड्याचा सामना करावा लागला. तीव्र उकाड्यामुळे एसी, कुलर, पंख्यांचा वापर वाढला आहे. यामुळे विजेची मागणीदेखील वाढली आहे.

अशात रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना त्यांच्या झोपेलादेखील रामराम घालावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT