Crowded Shikanji sorbet carts adjacent to the road in Nashik Naka area. esakal
नाशिक

Nashik Summer heat: जीवाची काहीली थांबविण्यासाठी थंड पेयांना मागणी! लिंबू शिकंजी सरबता, उसाच्या रसाला सर्वाधिक पसंती

Nashik News : भर उन्हात रस्त्यालगत असलेल्या लिंबू शिकंजी सरबत तसेच रसवंती हाउसफुल गर्दी खेचू लागल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा : सध्या तापमान वाढत चालले आहे. सकाळी नऊनंतर घरातून बाहेरही पडता येणार नाही इतके उन लागते. लग्नसराई व परीक्षांचा हंगाम असल्याने बाहेर पडल्याशिवाय पर्यायदेखील नाही. अशात उन्हामुळे जीवाची लाही लाही होत आहे. त्यामुळे अशा वातावरणात अर्थातच सर्वांना वेध लागतात ते गारेगार लिंबू सरबताचे. भर उन्हात रस्त्यालगत असलेल्या लिंबू शिकंजी सरबत तसेच रसवंती हाउसफुल गर्दी खेचू लागल्या आहेत. (Nashik Summer heat Demand for cold drinks increased)

कसमादे परिसरात उन्हाच्या तीव्रतेने चाळीशी गाठल्यामुळे घशाची कोरड थांबावी म्हणून थंड पेयाकडे नागरीक वळाल्याचे चित्र आहे. तीन ते चार दिवसांपासून उन्हाची तीव्र लाट असल्याने नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागल्याने भर उन्हात रस्त्यालगत असलेल्या लिंबू शिकंजी सरबत तसेच रसवंतीगृह हाउसफुल गर्दी खेचू लागल्या आहेत.

व्यावसायिक दिवसाकाठी पाचशे ते सहाशे लिंबू सरबत सध्या विक्री करीत आहेत. ग्रामीण भागातील अनेक नागरिक सरबत, उसाच्या रसाला पसंती देत आहेत. लग्नसराई असल्याने उन्हाची तीव्रता जास्त असल्याने यापासून तात्पुरती का असेना सुटका मिळविण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी शितपेयांच्या दुकानाकडे वळत आहे. परप्रांतीय व्यावसायिकांनीही लस्सी व आईस्क्रीमची दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर सर्वच रस्त्यांना लिंबू, सोडा, रसवंती, शिकंजी विक्रेते, शीतपेय विक्रीची दुकाने आहेत.  (Latest Marathi News)

"नामांकित कंपन्यांच्या पेयांच्या तुलनेत ग्राहक लस्सी, लिंबू शरबत व शिकंजीसारख्या देशी थंड पेयाला अधिक पसंती देत आहेत. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नागरिक तहान भागविण्यासाठी थंड पेयांचा आधार घेत आहेत."- अरुण पवार, नागरिक, सटाणा

"गेल्या दोन महिन्यांपासून आमचा व्यवसाय मध्यम गतीने चालू होता. मात्र, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने व्यवसायात तेजी आली आहे. लिंबू शिकंजी सरबत, उसाच्या रसाला सध्या सर्वाधिक मागणी आहे. तर लस्सी व ताकाची मागणी देखील वाढली आहे."- विश्‍वनाथ निकम, व्यावसायिक, सटाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT