Summer Heat Waves esakal
नाशिक

Summer Heat : मालेगावला तापमानाने ओलांडली चाळीशी; राज्‍यात उच्चांकी कमाल तापमानाची नोंद

Summer Heat : मार्चमध्येच मालेगावला पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून शनिवारी ४०.८ अंश सेल्सिअस ‍या कमाल तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Summer Heat : गेल्‍या काही दिवसांपासून तप्त उन्‍हाच्‍या झळाची तीव्रता अधिक वाढलेली आहे. त्‍यात मध्य महाराष्ट्राचे कमाल तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक असल्‍याची नोंद हवामान खात्‍याने घेतली आहे. दरम्‍यान शनिवारी (ता.२३) जिल्ह्यातील मालेगावचे तापमान राज्‍यातील उच्चांकी कमाल तापमान राहिले. मार्चमध्येच मालेगावला पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून शनिवारी ४०.८ अंश सेल्सिअस ‍या कमाल तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. (nashik maximum temperature recorded in state in malegaon marathi news)

मार्च महिन्‍यातच तीव्र उन्‍हाळा जाणवत असून, यामुळे जनजीवनावर प्रभाव पडतो आहे. दुपारी बारा ते सायंकाळी चार या दरम्‍यान शहरासह ग्रामीण भागातील कामकाज प्रभावित झाल्‍याचे दिसून येत आहे. गेल्‍या काही दिवसांपासून पाऱ्याचा आलेख चढताच असून, मालेगाव येथे कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले गेले. शनिवारी राज्‍यात सर्वात उच्चांकी कमाल तापमान मालेगावचे असून, ४०.८ अंश सेल्सिअस राहिले. तर किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस राहिले. नाशिकचे कमाल तापमान ३६.९ अंश आणि किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. .(latest marathi news)

उष्माघाताचा वाढता धोका

उन्‍हाच्‍या झळा वाढत असताना उष्माघाताचा धोका बळावला आहे. होळी पूर्वीच उन्‍हाचा तडाखा जाणवू लागला असल्‍याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे. यातून दुपारच्‍या वेळी शक्‍यतो घर किंवा कार्यालयाबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच उन्‍हात जाताना सर्व आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्‍यप्रकारे राखावे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT