White clothes sold in the market. esakal
नाशिक

Summer Heat : पारा चढताच सफेद कपड्यांच्या मागणीत वाढ; बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

Summer Heat : उन्हाचा पारा सतत वाढत आहे. जिवाची लाही होत असून, उन्हाच्या चटक्यापासून बचावासाठी नागरिकांकडून नानाविध प्रकार केले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Summer Heat : उन्हाचा पारा सतत वाढत आहे. जिवाची लाही होत असून, उन्हाच्या चटक्यापासून बचावासाठी नागरिकांकडून नानाविध प्रकार केले जात आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणून पांढरे कॉटन परिधान करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे अशा कपड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. शहरातील तापमान वाढले आहे.

उन्हाचा चांगला तडाखा जाणवत आहे. कामाव्यतिरिक्त नागरिक घराच्या बाहेर पडणे टाळत आहे. बहुतांशी भागातील रस्ते सुने पडले आहे. इतकेच नाही तर उन्हापासून बचावासाठी त्यांच्याकडून विविध प्रकार अवलंबले जात आहे. पांढऱ्या कपड्यांनी उन्हाचा चटका कमी जाणवत असल्याने पांढरे शर्ट, पॅन्ट, बंडी तर महिलांकडून पांढरे टॉप, कुर्ता, पंजाबी ड्रेस, साडी, लेगीज परिधान करण्याचे प्रमाण वाढले आहे.

बाजारात अशाप्रकारचे पांढरे कपडे खरेदीकडे कल वाढला आहे. दुकानांमध्येही पांढरे कपडे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. कॉटन (सुती) कपड्यांमुळे गरम होण्याचे प्रमाण कमी होते. उन्हाचा चटका जाणवत नाही. शिवाय त्यांचे वजनही कमी असल्याने उन्हाळ्यात अशा कपड्यांची अधिक मागणी असते.

पूर्वी केवळ साधे शर्ट आणि बंडी विक्रीस येत. सध्या बदलत्या युगाप्रमाणे नागरिकांची कपड्यांची बदलती पसंती लक्षात घेता, टी-शर्टपासून ते महिलांसाठी कुर्तीपर्यंत पारंपारिक तसेच वेस्टन पांढरी पोशाखही विक्रीस येत आहे. उन्हाळ्यात लुंगीचा वापर होत आला आहे. सुती कपड्याची लुंगी मोठ्या प्रमाणावर पुरुषांकडून परिधान केली जाते. सध्या उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असल्याने इतर दिवसांच्या तुलनेत लुंगीचा वापर वाढला आहे. २५० ते ३०० रुपयांपर्यंत लुंगीची विक्री होत आहे.

''पांढऱ्या कपड्यांना विशेष मागणी होत आहे. महिलांचे पांढरी कुर्ता आणि टॉप अधिक मागणी आहे. तसेच प्लेन पांढऱ्या कपड्यांसह फुलांची डिझाईन असलेले पांढरे कपडेही विक्री होत आहे. यंदा दरांमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे.''- बंडू गंगावणे, विक्रेता  (latest marathi news)

कपड्यांचे प्रकार..................दर

शर्ट.......................२०० ते १ हजार

पायजमा....................२५० ते ४००

लुंगी.......................२५० ते ३००

लहान मुलांची बंडी..............५० ते ७०

ज्येष्ठांची बंडी..................१५० ते २००

लेडीज कुर्ता...................२०० ते ३००

टॉप........................३५० ते १ हजार ५००

प्लाझो.......................१५० ते २००

लेगीज.......................२०० ते ३५०

पंजाबी ड्रेस....................५०० ते २ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT