Temperature  esakal
नाशिक

Nashik Summer Heat : मालेगावचा पारा 43.2 अंशावर! उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण

Nashik News : शहर व परिसरातील तापमानाचा पारा आजही कायम होता. येथील तापमानाच्या बाबतीत ‘पारा वाढता वाढता वाढेच’ अशी स्थिती आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर व परिसरातील तापमानाचा पारा आजही कायम होता. येथील तापमानाच्या बाबतीत ‘पारा वाढता वाढता वाढेच’ अशी स्थिती आहे. मंगळवारपेक्षा बुधवारी (ता. २२) तापमानात आणखी वाढ झाली. मंगळवारी (ता. २१) पारा ४३ अंशावर होता. बुधवारी येथे ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. (Summer Heat Malegaon mercury at 43 degrees)

सकाळी सहापासूनच उन्हाच्या झळा असह्य झाल्या होत्या. रात्री आठपर्यंत उन्हाच्या झळा जाणवत होत्या. उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण आहेत. गेल्या आठवड्यातील अवकाळीनंतर तीन दिवसांपासून सूर्यनारायणाचा प्रकोप जाणवत आहे. अतिउष्णतेच्या लाटा व वाढत्या तापमानामुळे लहान मुले, वृद्ध, गर्भवती, अपघातग्रस्त रुग्ण त्रस्त आहेत.

उकाड्याने हैराण झालेले नागरिक गच्ची, बंगल्याच्या टेरेसवर झोपण्याला पसंती देत असले तरी रात्रीदेखील उष्म्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच हवा नसल्याने झळांचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. उन्हात फिरणाऱ्यांना नाकातून रक्त येण्याचा त्रास होऊ लागला आहे. सायंकाळपर्यंत शहरातील बाजारपेठा ओस होत्या. (latest marathi news)

उष्णतेची लाट केव्हा ओसरणार, याच चिंतेने नागरिकांना ग्रासले आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा कायम होता. यामुळे शहरातील जनजीवन व विविध व्यवसायांवरही काहीसा परिणाम झाला. अशातच वीजपुरवठा खंडित झाला तर अक्षरश: अंगाला काटा येत आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

पंखे व अन्य विजेची उपकरणेही गरम हवा फेकू लागले असून, दुपारी घर, कार्यालय, आस्थापनांमध्ये बसणे मुश्कील झाले आहे. नागरिक उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना करत आहेत. मॉन्सून सुरू होईपर्यंत तापमानाचा पारा कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO House: घरखरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सिडको घरांच्या दरात १० टक्के कपात, पण कोणत्या? सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Paithan News : इंदेगाव शिवारातील कालव्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ!

एका क्षणात बदलेलं आयुष्य... मुंबईतील BMW hit-and-run प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा कठोर निकाल! महिलेला १.५ किलोमीटर फरफटत नेलं होतं

Latest Marathi News Live Update: हक्कभंग प्रकरणी चार पत्रकारांना पाच दिवसांच्या कारावासाची शिफारस

Katraj Lake News : कात्रज तलावातील ३० हजार घनमीटर गाळ काढल्याचा पालिकेचा दावा; नागरिकांतून प्रश्नचिन्ह; भ्रष्टाचार झाल्याचा आरोप!

SCROLL FOR NEXT