Nashik Summer Heat  esakal
नाशिक

Nashik Summer Heat : नाशिकचा पारा 41.8 अंशांवर; हंगामातील उच्चांकी कमाल तापमान, सूर्यकिरणे असह्य

Nashik News : मंगळवारी (ता. २१) नाशिकचे कमाल तापमान ४१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यंदाच्‍या हंगामातील हे उच्चांकी कमाल तापमान आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उन्‍हाळ्याच्‍या झळा कायम असून, दुपारी सूर्यकिरणे असह्य वाटू लागली आहेत. त्‍यातच मंगळवारी (ता. २१) नाशिकचे कमाल तापमान ४१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यंदाच्‍या हंगामातील हे उच्चांकी कमाल तापमान आहे. येत्‍या काही दिवसांत उन्‍हाची तीव्रता कायम राहणार असल्‍याचे आरोग्‍याची काळजी घेण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे. (Nashik Summer Heat mercury at 41 degrees)

यापूर्वी गेल्‍या २८ एप्रिलला नाशिकचे कमाल तापमान ४१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. यंदाच्‍या हंगामातील हे उच्चांकी तापमान ठरले होते. मात्र आता मंगळवारी कमाल तापमान थेट ४१.८ अंश सेल्सिअसवर पोचले. मार्चपासूनच उन्‍हाळ्याच्‍या झळा जाणवत असून, सध्या तीव्रता प्रचंड वाढलेली आहे.

कडक उन्‍हामुळे दिवसाच्‍या वेळी शहरासह उपनगरी भागांतील रस्‍त्‍यांवर शुकशुकाट बघायला मिळतो आहे. तर काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्‍या नागरिकांकडून उन्‍हापासून बचावासाठी उपरणे, टोपी, स्‍कार्फ आदींची मदत घेतली जाते आहे. यापूर्वीदेखील काही दिवस नाशिकचे कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले केले होते. (latest marathi news)

मॉन्‍सूनच्‍या आगमनापर्यंत पारा चढा राहाण्याची शक्‍यता असून, कमाल तापमान चाळीस अंशापेक्षा जास्‍त राहण्याचा अंदाज आहे. सध्याच्‍या परिस्थितीत उन्‍हापासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याचा सल्‍ला जाणकारांकडून दिला जातो आहे. भरपूर पाणी पिण्याची आवश्‍यकता असून, शक्‍यतो उन्‍हापासून थेट संपर्क टाळण्याचे आवाहनदेखील केले जाते आहे.

उकाड्याने नागरिक हवालदिल

आधीच तप्त सूर्यकिरणे त्‍यात उन्‍हामुळे उकाडा वाढला आहे. शहर परिसरात मंगळवारी दुपारी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्‍याने उकाड्यात भर पडून नागरिक हवालदिल झाल्‍याचे बघायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : क्षुल्लक माणसे माझ्या प्रसिद्धीचा आधार घेऊ शकत नाहीत - कंगना रणौत

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT