Summer Heat esakal
नाशिक

Nashik Summer Heat News : पाऱ्यात दोन अंशांची घसरण, कमाल तापमान 39.4 अंश

Nashik News : गेल्‍या आठवड्यात सलग तीन-चार दिवस पारा चाळीस अंशांपेक्षा अधिक नोंदविला गेला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Summer Heat News : वातावरणीय बदलामुळे सध्या रोजच पाऱ्यात चढ-उतार सुरु आहे. एका दिवसात शहरातील तापमानात दोन अंशांनी घसरण झालेली असून, सोमवारी (ता.२९) नाशिकचे कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. किमान तापमान वाढलेलेच असून, २५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. (Nashik Summer Heat Mercury drops by two degrees)

गेल्‍या आठवड्यात सलग तीन-चार दिवस पारा चाळीस अंशांपेक्षा अधिक नोंदविला गेला होता. त्‍यानंतर मात्र काही प्रमाणात पारा घसरला होता. त्‍यातच रविवारी (ता.२८) नाशिकचे कमाल तापमान ४१.२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.

एका दिवसातच सोमवारी कमाल पारा १. ८ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक घसरला असून, ३९.४ अंश सेल्सिअस अशी नोंद घेण्यात आलेली आहे. किमान तापमानात मात्र किरकोळ वाढ नोंदविली आहे. येत्‍या काही दिवसांत वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे तापमानात चढ-उतार सुरु राहणार असल्‍याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्‍यान दुपारच्‍या वेळीचे ऊन असहनीय होत असल्‍याने जनजीवनावर प्रभाव पडत असल्‍याचे शहर परिसरात बघायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT