summer temperature esakal
नाशिक

Summer Heat : वाढत्या उष्म्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये कक्ष; शहरात तापाचे साडेतीन हजार रुग्ण

Summer Heat : शहरात तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने तापाच्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Summer Heat : शहरात तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने तापाच्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. अडीच महिन्यांत तीन हजार ५२९ तापाचे रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आढळल्याने रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले जाणार आहेत. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाच्या झळाही तीव्रपणे जाणवतील, अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. (nashik summer heat Three and half thousand fever patients in city due to increasing temperature marathi news)

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तापमानाने सरासरी ओलांडल्याचे शहरी भागात दिसून येत आहे. सर्दी व खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने थंड पाणी पिण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

मागील अडीच महिन्यांत ताप सदृश आजाराच्या ३५२९ रुग्णांची नोंद महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये झाली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय विभागाने रुग्णालयांमध्ये उष्पाघात कक्ष तयार केला जात आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली. (latest marathi news)

उष्माघात टाळण्यासाठी उपाय

- दुपारी घराबाहेर पडू नये.

- वयोवृद्ध, लहान मुले, गरोदर स्त्रियांनी उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी.

- अंगावर पुरळ आल्यानंतर तत्काळ उपचार घ्यावेत.

- रस्त्यांवरील दूषित बर्फाचे गोळे, शीतपेय टाळावेत.

- लिंबू सरबत, ताकाचे अधिक सेवन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT