Onion crop blooming in the area of ​​Lakhmapur (Baghlan).
Onion crop blooming in the area of ​​Lakhmapur (Baghlan). esakal
नाशिक

Nashik Onion Crop: यंदा उन्हाळी कांदा जोमात! अनुकूल वातावरणामुळे बहरले पीक, उत्पन्न वाढीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : तालुक्यासह कसमादेतील दुष्काळी परिस्थितीत केंद्र शासनाने निर्यातबंदी केल्यामुळे गेल्या अडीच महिन्यापासून कांद्याला जेमतेम भाव मिळत आहे. निर्यात बंदी मागे घेण्याच्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी डोळेझाक केली आहे. परिस्थितीशी दोन हात करत उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची जम्बो लागवड केली आहे.

यावेळी आतापर्यंत तरी निसर्ग बळीराजाला साथ देत आहे. अनुकूल वातावरणामुळे उन्हाळी कांद्याचे पीक (Onion Crop) जोमात असून उत्पन्न वाढीची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे काही ठिकाणी कमी लागवड झाली असली तरी उत्पन्न वाढणार असल्याने गेल्या वर्षाएवढाच उन्हाळी कांदा बाजारात येऊ शकेल. (Nashik Summer onion year Due to favorable climate crops flourished income increased marathi news)

गेल्यावर्षी सर्वत्र जेमतेम पाऊस झाला. शेतकऱ्यांनी मका, बाजरी, कपाशी आदी खरीप पिकांची लागवड केली. दरम्यानच्या काळात पाऊस रुसल्याने पिके कोमेजली. त्याचवेळेत कांदा बाजारात भाव खात होता. जून ते नोव्हेंबर या कालावधीत उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळाला. दिवाळीनंतर तर कांद्याचे भाव चार हजारावर गेले होते.

भाव मिळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी मका, बाजरी व कपाशीचे अर्धवट पीक काढून त्या जागी लेट खरीप कांदा लागवड केली. लागवडीची धूम सुरु असतानाच केंद्राने ८ डिसेंबर २०२३ ला कांदा निर्यातबंदी लागू केली. निर्यातबंदी लागू करताच कांद्याचे भाव ५० ते ७० टक्क्क्यांनी घसरले. शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली. मात्र या आंदोलनाचा शासनावर कोणताही फरक पडला नाही.

सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांनी केंद्राकडे बोट दाखवत आपली सुटका करून घेतली. अडीच महिन्यापासून कांद्याचे भाव हजार ते पंधराशे रुपये दरम्यान आहे. बहुतांशी कांदा ७०० ते ८०० रुपये दराने विकला गेला. भाव आणखी घसरण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विक्री केली.

कसमादेसह नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी उन्हाळी कांद्याची लागवड व उत्पन्न घटेल अशी चर्चा होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी महागडे बियाणे, उळे घेऊन उन्हाळी कांदा लागवड केली आहे. मालेगाव, बागलाण व नांदगाव या तीन तालुक्यात गेल्या वर्षी जवळपास २ लाख ९० हजार एकरवर उन्हाळी कांदा लागवड करण्यात आला होता.

यावर्षी या तीन तालुक्यात जानेवारीअखेर २ लाख ७ हजार ३३५ एकरवर लागवड झाली आहे. उर्वरित जिल्ह्यात देखील हजारो एकरवर कांदा लागवड करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत निसर्ग शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. सुदैवाने बेमोसमी पाऊस, गारपीट झाली नाही. कांद्याला असलेली आवश्‍यक थंडी देखील पडली.

त्यामुळे उन्हाळी कांद्याचे पीक जोमात आहे. कसमादेत सर्वत्र उन्हाळी कांद्याची रेलचेल आहे. काही ठिकाणी गेल्या वर्षाच्या तुलनेने कमी अधिक प्रमाणात लागवड झाली असली तरी अनुकूल वातावरणामुळे उत्पन्न वाढणार आहे. चांगल्या वातावरणामुळे फवारणी व इतर खर्चातही बचत झाली. (Latest Marathi News)

मार्चच्या मध्यात उन्हाळी कांदा

रांगडा व लेट खरीप कांदा सध्या बाजारात येत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून कांद्याची आवक घटली आहे. यातून लेट खरीप कांदा अखेरच्या टप्प्यात असल्याचे मानले जात आहे. एरवी मार्च अखेरपर्यंत लाल कांदा बाजारात यायचा. यावर्षी मात्र कमी उत्पादनामुळे लाल कांद्याची आवक कितपत राहते हे पहाणे उत्सुकतेचे ठरेल.

उन्हाळी कांदा १५ मार्चनंतर बाजारात येऊ शकेल. शेतकऱ्यांच्या आशा आता उन्हाळी कांद्यावर अवलंबून आहेत. निर्यातबंदी मागे घेऊन उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळाल्यास कसमादेच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. कांदा निर्यातबंदी मागे न घेतल्यास खानदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत कांदा हा प्रचाराचा मुद्दा ठरु शकेल.

"मागील वर्षातील एकूण कांदा लागवड क्षेत्रापैकी यावर्षी १५ ते २० टक्क्यांनी लागवड क्षेत्र घटले आहे. असे असले तरी स्वच्छ हवामान व चांगल्या वातावरणामुळे कांदा उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ होणार आहे. वातावरण असेच राहिल्यास गेल्या वर्षाएवढेच उत्पन्न मिळू शकेल. किंबहुना त्यात वाढच होईल."- गोकूळ अहिरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT