Summer Temperature Drop  esakal
नाशिक

Summer Temperature Drop : उकाड्यापासून दिलासा; पाऱ्यात 5 अंशांची घसरण पाऊस, वाऱ्यामुळे किमान तापमानही घसरले

Nashik News : पाऊस व वातावरणातील वाऱ्यामुळे उन्‍हाळ्याची झळ कमी करण्यास मदत झालेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तप्त उन्‍हामुळे गेल्‍या काही दिवसांपासून उकाडा जाणवत असताना, दोन दिवस झालेल्‍या वळवाच्या पावसाने शहरातील तापमानात घसरण झालेली आहे. एका दिवसात कमाल तापमानात ५ अंशांनी घसरण नोंदविली आहे. पाऊस व वातावरणातील वाऱ्यामुळे उन्‍हाळ्याची झळ कमी करण्यास मदत झालेली आहे. (Summer Temperature Drop)

त्‍यामुळे उकाड्यापासून त्रस्‍त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. गेल्‍या महिन्‍याभरापासून पाऱ्यात सातत्‍याने चढउतार बघायला मिळतो आहे. एप्रिल व नंतर मे महिन्‍यातही अनेक वेळा पारा थेट चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला होता. विशेषतः दुपारच्‍या वेळी तप्त उन्‍हामुळे शहरातील वर्दळ कमी झाल्‍याचे दृष्य होते.

पारा पुन्‍हा चाळीशीकडे झेप घेत असताना अचानक आलेल्‍या वळवीच्‍या पावसाने ऐन मे महिन्‍यात नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. शनिवारी (ता.११) नाशिकचे कमाल तापमान ३९.३ अंश सेल्सिअस नोंदविलेले असताना, अवघ्या एका दिवसात ५ अंश सेल्सिअसची घसरण होऊन रविवारी (ता.१२) कमाल तापमान ३४.१ अंश सेल्सिअसवर पोचले. तर किमान तापमानातही एक अंश सेल्सिअसची घट नोंदविली आहे. (latest marathi news)

ढगाळ वातावरण कायम

शनिवारी (ता. ११) दिवसभर आकाश मोकळे राहिलेले असताना, रात्री उशिरा मात्र अचानक ढग दाटून येत जोरदार पाऊस बरसला होता. रविवारी (ता. १२) देखील पावसाचा अंदाज असताना, दिवसभर ढग दाटलेले बघायला मिळाले. सायंकाळी उशिरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. यासोबत वातावरणात सोसाट्याचा वारा देखील सुटलेला होता.

गेल्‍या पाच दिवसातील तापमानाची स्‍थिती (पारा अंश सेल्सिअसमध्ये)

तारीख किमान कमाल

८ मे २० ३९.२

९ मे २२.६ ३७.४

१० मे २३.२ ३७.३

११ मे २३ ३९.३

१२ मे २२ ३४.१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Seema Kohali: सीमा कोहली; स्थलांतर, स्मृती आणि आध्यात्मिकतेतून घडलेले सीमाचे कलाविश्व

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT