Nationalist Congress Party (Ajit Pawar group) State President Sunil Tatkare during a discussion with Chhagan Bhujbal on Thursday esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्या नाराजीवर तटकरेंचे ‘ऑल इज वेल’; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी घेतली भुजबळांची भेट

Nashik News: नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष तटकरे हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील, असे वाटले होते. त्यांच्या उमेदवारीची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली होती, हे खरे आहे. मात्र, उमेदवारीस उशीर झाला.

त्यामुळे भुजबळ यांनी स्वतःच याबाबतची भूमिका स्पष्ट केली. स्वाभाविकपणे त्यांच्या समर्थकांमध्ये काही पडसाद उमटले. मात्र, त्यांची समजूत भुजबळ यांनी काढली असून, ‘ऑल इज वेल’ असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष तटकरे हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते.

गुरुवारी (ता. १६) त्यांनी भुजबळ फार्म कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री भुजबळ यांची भेट घेतली. या वेळी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. तटकरे म्हणाले, की भुजबळ राज्याचे नेते आहेत. (latest marathi news)

निवडणुकीबाबत राज्यातील मतदारसंघातील स्थिती आणि नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील महायुती प्रचाराबाबत सविस्तर चर्चा केली. यात दोन्ही मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांसाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितल्याचे तटकरे यांनी सांगितले. भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत तटकरे म्हणाले, की नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ यांची उमेदवारी मानली जात होती.

मात्र, पाच टप्प्यांत निवडणुका असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत काहीसा उशीर झाला. त्यामुळे भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. या भूमिकेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती; परंतु भुजबळ यांनी त्यांची समजूत काढली असून, ते प्रचारात सक्रिय असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. या वेळी माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कार्याध्यक्ष गोरख बोडके, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT