Bosch company  esakal
नाशिक

Nashik News : बॉश कंपनीची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

Nashik : सातपूर औद्योगिक वसाहतीत मधील बॉश कंपनीने कमी केलेल्या कंत्राटी कामगारांबाबत सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सातपूर औद्योगिक वसाहतीत मधील बॉश कंपनीने कमी केलेल्या कंत्राटी कामगारांबाबत सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने कंपनीची याचिका फेटाळून लावत २०२२ मध्ये नाशिक औद्योगिक न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. यामुळे या कामगारांना कामावर घेऊन २०२२ पासूनचे वेतनही द्यावे लागणार असल्याचे कामगार संघटनेचे पदाधिकारी अमीर निकम यांनी सांगितले. (Supreme Court rejected Bosch company petition )

ऐन कोरोनाकाळात बॉश मधील ओजीटी व कंत्राटी म्हणून सुमारे १० ते १२ वर्षांपासून काम करणारे कामगारांना अचानक कामावरून कमी केल्याने या कामगारांनी सुरवातीला कंपनीतील युनियनकडे दाद मागितली. पण युनियन पदाधिकाऱ्यांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कामगारांनी स्वतंत्र संघटना स्थापन करून नाशिक औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली. (latest marathi news)

न्यायालयाने संबंधित कामगारांना जानेवारी २०२२ मध्ये व्यवस्थापनाला कामावर घेण्याचे आदेश दिले होते. तसेच वेतनही देण्याबाबत ऐतिहासिक निकाल दिला होता. पण व्यवस्थापनाने सदर निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत स्टे घेतला. पुढे कामगार संघटनेनेही याबाबत आपली बाजू मांडली. उच्च न्यायालयानेही औद्योगिक न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला.

कंपनी व्यवस्थापनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतली. सुप्रिम कोर्टाने सुरवातीला उभय पक्षात तडजोड करण्याचे सांगितले, पण उभय पक्षात एकमत न झाल्याने सोमवारी (ता. २२) सुप्रिम कोर्टाने कंपनीची याचिका फेटाळल्याचे कामगार पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बॉशच्या इतिहासात कंपनीत कंत्राटी कामगार लढा सुप्रिम कोर्टापर्यंत जाण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT