चौकशीदरम्यान संशयिताचा राडा
कार्यालयातल्या काचा फोडून अंमलदाराला धमकी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका संशयिताने शहर गुन्हे शाखेच्या कार्यालयातच राडा घालत पोलिसांना जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर, हातातील लोखंडी कड्याने काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. सदरची घटना मंगळवारी (ता. ३) दुपारी एकच्या सुमारास घडली.
नाजिम शेख (रा. भारतनगर झोपडपट्टी, मुंबई नाका) असे संशयिताचे नाव आहे. अंमलदार चारुदत्त निकम (३२) यांच्या फिर्यादीनुसार, शहर गुन्हे शाखा अंबड युनिट तीनचे पथक भारतनगर परिसरात चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेत होते. उपनगर व इंदिरानगर ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यांमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित नाजिम शेख हा भारतनगर येथील यासीन शहा मदरसा समोरील भंगार दुकानाजवळ आल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन मुख्यालयातील बॅरेक नंबर १५ मधील युनिट-३ च्या कार्यालयात आणले. उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदारांच्या समक्ष संशयितांकडे विचारपूस सुरू असताना, त्याने अटकेच्या भीतीने अचानक आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला असता, तो अंमलदार निकम यांच्या अंगावर धावून गेला व त्यांच्या शर्टची कॉलर पकडली. यानंतर संशयिताने उपनिरीक्षक पाटील व उपस्थित कर्मचाऱ्यांना धमकी देत शिवीगाळ केली. तसेच स्वतःच्या हातातील कड्याने कार्यालयातील भिंतीवर लावलेली काच फोडून गोंधळ घातला व पोलिसांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला. काच फोडताना त्याच्या हाताला दुखापतही झाली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सहायक उपनिरीक्षक सोनवणे पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.