नाशिक

स्वाइन फ्लू चा उद्रेक वाढला

CD
नाशिक शहरात स्वाइन फ्लूचा उद्रेक कायम; रुग्णसंख्या ३५९ वर, वैद्यकीय यंत्रणा सतर्क सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : पावसाचा जोर ओसरला असला तरी शहर आणि जिल्ह्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही. विशेषतः स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सप्टेंबर महिन्यात तब्बल १९२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण स्वाइन फ्लूबाधितांची संख्या ३५९ वर पोहोचली आहे. स्वाइन फ्लू हा एच वन एन वन विषाणूमुळे होणारा श्वसनाचा संसर्गजन्य आजार आहे. खोकला, शिंक यातून हवेतील थेंबांद्वारे त्याचा प्रसार झपाट्याने होतो. पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्याने विषाणू अधिक काळ सक्रिय राहतो, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास वर्षाच्या सुरुवातीला परिस्थिती नियंत्रणात होती. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ सात रुग्ण आढळले होते. मात्र जुलै महिन्यापासून रुग्णवाढीला सुरुवात झाली. जुलैमध्ये २१, तर ऑगस्टमध्ये ११९ रुग्णांची नोंद झाली होती. सप्टेंबरमध्ये हा आकडा १९२ वर गेला आहे. मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर सप्टेंबरमध्ये सहा रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे ११ जणांचा बळी गेला असून, यामध्ये महापालिका हद्दीतील तीन आणि ग्रामीण भागातील आठ रुग्णांचा समावेश आहे. सध्या २७ बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. डेंगीचे १८२ रुग्ण दुसरीकडे डेंगीच्या रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान डेंगीचे ५६ रुग्ण होते. ऑगस्ट महिन्यात ४५ नव्या रुग्णांची भर पडली, तर सप्टेंबरच्या चार आठवड्यांत ८१ जणांना डेंगीची लागण झाली आहे. त्यामुळे डेंगीबाधितांची एकूण संख्या १८२ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''माझ्याविरोधात 45 एफआयआर आहेत, 100 पाहिजेत...'' राहुल गांधींनी सुरु केला रस्त्यावरचा एल्गार

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरकडे निघालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवले; राहुल गांधी, प्रियंका गांधी ताब्यात

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

DCM Sunetra Pawar : दुष्काळाची जाणीव ठेवा; ऊस जगविण्याचे आव्हान मोठे

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

SCROLL FOR NEXT