नाशिक

तैवानच्या ‘ग्लोबल सप्लाय चेन’मध्ये नाशिकची दमदार एन्ट्री

CD
फोटो : 31671 नाशिक : तैवान सोबत सामंजस्य करार करताना आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, रवी महादेवकर, संजय महाजन, अविनाश बोडके, हेमंत पाटील. तैवानच्या ‘ग्लोबल सप्लाय चेन’मध्ये नाशिकचा प्रवेश आयमाबरोबर सामंजस्य करार: गुंतवणूक संधीचा मार्ग खुला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.७ : नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून स्टारटेक अलायन्स (तैवान) आणि अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. तैवानमधील उद्योगांच्या पुरवठा साखळीत नाशिकच्या उत्पादन उद्योगांना सहभागी होण्याची, तसेच तंत्रज्ञान सहकार्य, निर्यात आणि नव्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होण्याची दारे खुली झाली आहेत, अशी माहिती आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी दिली. आयमा, नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्टारटेक अलायन्स, तैवान यांच्या सहकार्याने आयोजित चार दिवसीय बी-टू-बी व्यवसाय विकास व विक्रेता संवाद कार्यक्रमाची यशस्वी सांगता या सामंजस्य कराराने झाली. या कार्यक्रमादरम्यान तैवानच्या उद्योग प्रतिनिधींनी नाशिकमधील विविध उत्पादन कंपन्यांशी थेट व्यावसायिक संवाद साधला. प्रिसिजन इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल व ईव्ही घटक, वैद्यकीय उपकरणे, अचूक यंत्रनिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स व ३सी घटक, शीट मेटल, प्लास्टिक आणि ऑटोमेशन अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी यात सहभाग घेतला.बी-टू-बी बैठका आणि कारखाना भेटींच्या माध्यमातून तैवानच्या प्रतिनिधींनी नाशिकमधील कंपन्यांची तांत्रिक क्षमता, उत्पादन क्षमता, गुणवत्ता प्रणाली, पायाभूत सुविधा आणि निर्यातक्षमता यांचा आढावा घेतला. या प्रक्रियेत काही कंपन्यांची पुढील व्यावसायिक चर्चा, पुरवठादार मूल्यांकन, विक्रेता नोंदणी आणि संभाव्य व्यावसायिक सहकार्यासाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी आयमाच्या निर्यात समितीचे अध्यक्ष रवी महादेवकर म्हणाले, “हा सामंजस्य करार केवळ औपचारिक करार नसून नाशिकच्या उत्पादन क्षमतेला तैवानच्या जागतिक पुरवठा साखळीशी जोडणाऱ्या संरचित प्रक्रियेची सुरुवात आहे. तंत्रज्ञान सहकार्य, पुरवठादार विकास, निर्यात आणि नाशिकमध्ये नव्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण करणारे दीर्घकालीन व्यावसायिक संबंध विकसित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” सामंजस्य कराराच्या वेळी आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, मानद सरचिटणीस संजय महाजन, कोषाध्यक्ष अविनाश बोडके, हेमंत पाटील, राहूल गांगुर्डे, जयंत पगार, शरद दातीर, विनोद कुंभार, कमलेश उशीर, सागर बोराडे, जगदीश पाटील, राममूर्ती राजू उपस्थित होते. आयमा सरचिटणीस संजय महाजन यांनी आभार मानले. कोट तैवान प्रतिनिधी मंडळ बरोबरच्या चार दिवसीय बी-टू-बी कार्यक्रमाची यशस्वी सांगता आणि त्यानंतर झालेला सामंजस्य करार हा नाशिकच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. नाशिकच्या उद्योगांना तैवानच्या जागतिक बाजारपेठेशी जोडण्याबरोबरच निर्यातवाढ, तंत्रज्ञान हस्तांतरण, पुरवठादार विकास आणि नव्या गुंतवणुकीला चालना देण्याची क्षमता या भागीदारीत आहे. - राजेंद्र पानसरे, अध्यक्ष (आयमा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

MP Murlidhar Mohol : 'विकसित भारत’चा संकल्प प्रत्येक भारतीयाचा व्हावा; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

IMD Rain Alert : 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, काही भागांत ताशी 75 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, महाराष्ट्रातूनही मान्सूनच्या माघारीला पोषक स्थिती

Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती पश्चिम बंगाल सरकारचे सल्लागार म्हणून नियुक्त; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल

Pune News : चारा टंचाईआधीच पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’; पीक अवशेष जाळण्याऐवजी साठवणूक, प्रक्रिया आणि पोषणमूल्यवर्धनावर भर

SCROLL FOR NEXT