The water being released in the Gram Panchayat well here with the help of a tanker. esakal
नाशिक

Nashik Water Shortage : पिंपळगाव (वा) ला 29 वर्षानंतर टॅंकर; 5 दिवसाआड पाणी

Water Shortage : एक ते दीड महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कमी अधिक प्रमाणात पाण्याचा साठा असलेले स्रोत आटल्याने पिंपळगाव वासियांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Shortage : एक ते दीड महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कमी अधिक प्रमाणात पाण्याचा साठा असलेले स्रोत आटल्याने पिंपळगाव वासियांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अखेरीस ग्रामपंचायतीने प्रशासनाशी योग्य तो समन्वय साधत टँकरद्वारे पाच दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. यापूर्वी देखील दुष्काळ होता, मात्र २९ वर्षांनंतर प्रथमच पिंपळगाव वासियांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. (Nashik Tanker to Pimpalgaon after 29 years Water every 5 days marathi news)

तालुक्यातील पूर्व भागातील बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पिंपळगाव (वा.) येथे महालपाटणे येथून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सुरवातीपासूनच या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. एक ते दीड महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने या भागातील पाण्याचे स्रोत असलेले जलसाठे, विहीरी, बोअरवेल्स, कूपनलिका आटल्याने या भागातील जनतेला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे.

विहिरींनी तळ गाठल्यामुळे उन्हाळी कांदा पिकाला देखील टंचाईची झळ सोसावी लागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांवर पाण्याअभावी लागवड केलेल्या कांद्याच्या शेतात मेंढ्या सोडण्याची नामुष्की ओढवली. यावर्षी पाटाचे पाणी न आल्यामुळे भयानक व भीषण दुष्काळ पिंपळगावकर भोगत आहे. गाव विहिरींचे पाणी व टँकर हा मध्य साधून गावात आता पाणीपुरवठा सुरू आहे. (latest marathi news)

सद्यःस्थितीत २२ हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या दोन खेपा असे एकूण ४४ हजार लिटरचा पाणी रोज विहिरीत सोडण्यात येते. विहिरीत पाण्याचा साठा करून सुमारे २ लाख १० हजार लिटर पाणी ग्रामपंचायतीच्या टाकीत टाकले जाते. त्यानंतर त्या पाण्याचा पुरवठा गावात केला जातो.

''सध्याची पाणीटंचाई संदर्भातील परिस्थिती लक्षात घेऊन शासनातर्फे टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र ही परिस्थिती दिवसेंदिवस बदलत जाईल त्यामुळे गावकऱ्यांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा. पाणी जपून वापरावे.''- नदीश थोरात, उपसरपंच पिंपळगाव (वा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT