chief Uddhav Thackeray after the official candidacy was announced in Mumbai While accepting the award from the hands of Adv. Sandeep Gulve. Neighbors Sanjay Raut, Anil Parab etc. esakal
नाशिक

Teacher Constituency Election : संदीप गुळवे यांना ‘मविआ’कडून अधिकृत उमेदवारी; शिक्षक मतदारसंघ निवडणूक

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप गुळवे यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप गुळवे यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. सोमवारी (ता. ३) मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटलेल्या जागांवर अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. यात मुंबईचे दोन, तर नाशिकच्या शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे.

गुळवे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच विविध शिक्षक संघटनेने त्यांचे स्वागत केले. काही दिवसांपूर्वी ‘मविआ’त कोकण आणि नाशिकच्या जागेबाबत चर्चा सुरू असताना काँग्रेसने कोकणची जागा घेत तेथून रमेश कीर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ॲड. गुळवे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आघाडीतील प्रमुख पक्षांच्या संमतीने गुळवे यांना उमेदवारी मिळण्याचे सूतोवाच मिळाले होते.

त्यानंतर सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब होत मुंबई येथे एबी फॉर्मचे वाटप झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह विभागातील शिक्षक नेते उपस्थित होते.

‘मातोश्री’ येथे झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी संदीप गुळवे यांची उमेदवारी जाहीर करताना महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष एकदिलाने गुळवेंच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगत गट-तट विसरून विभागातील सर्व नेते, संस्थाचालक, शिक्षकवर्ग यांना प्रलंबित प्रश्न सोडवणुकीसाठी गुळवे यांना मुंबईत पाठवण्याचे आवाहन केले. आदित्य ठाकरे यांनीही गुळवे यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा केली. (latest marathi news)

"‘मविआ’तर्फे नाशिक विभागातून ॲड. संदीप गुळवे यांची उमेदवारी घोषित करताना आनंद होत आहे. ॲड. संदीप यांना त्यांच्या वडिलांपासून मोठा राजकीय वारसा मिळाला आहे. जिल्ह्याच्या विकासात गुळवे कुटुंबीयांचे योगदान मोठे आहे. शिक्षकांना ज्या सुसंस्कृत लोकप्रतिनिधीची गरज आहे, ती ॲड. गुळवे यांच्या रूपाने पूर्ण होईल, ही खात्री आहे. ते सुंस्कृत आणि उच्चशिक्षित शिक्षक आमदार म्हणून प्रलंबित प्रश्न सोडवून आपली वेगळी छाप पडतील, यात मला शंका नाही. मी त्यांना विजयी शुभेच्छा देतो." - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)

"आज महाविकास आघाडीतर्फे मला अधिकृत उमेदवारी मिळाली. मी उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांचे आभार मानतो त्यांनी माझी शिफारस केली. आगामी काळात शिक्षकांच्या संबंधी ज्या प्रमुख मागण्या आहेत, त्यांना प्राधान्याने सोडविण्यावर विशेष भर दिली जाईल." - ॲड. संदीप गुळवे उमेदवार, मविआ नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा डंका ! तीन दिवसात तिन्ही सिनेमांनी केलेलं कलेक्शन घ्या जाणून

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

SCROLL FOR NEXT