counting center 
नाशिक

Nashik Teacher Constituency Result: नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ! ठाकरे गटाच्या आक्षेपानंतर मतमोजणी प्रक्रिया थांबवली!

Nashik Teacher Constituency Result counting center :जळगाव जिल्ह्यातील चोपडा गावातील २२ क्रमांकाच्या बुथवर ९३५ मतदान झालं आहे, पण मतपेटीमध्ये ९३८ मतपत्रिका आढळून आल्या आहेत.

कार्तिक पुजारी

Nashik: नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीत तब्बल ३ मतपत्रिका जास्त आढळून आल्या आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सध्या ही मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. या सर्व प्रकरामुळे मतमोजणी केंद्रावर प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा गावातील २२ क्रमांकाच्या बुथवर ९३५ मतदान झालं आहे, पण मतपेटीमध्ये ९३८ मतपत्रिका आढळून आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ही मतपेटी बाजूला ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. मुख्य निवडणूक आयोगाने याबाबत कारवाई करून निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, '२२ क्रमांकावर ९३५ मतदान झाले असताना ९५८ मतपत्रिका आढळून आल्या आहेत. त्यामुळे सध्या मतमोजणी थांबवण्यात आली आहे. यामध्ये पारदर्शकता यावी. तीन मतपत्रिका कुठून आली. याची चौकशी करण्यात यावी.' इतर उमेदवारांनी देखील यावर आक्षेप घेतला आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार रिंगणात आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे देखील आव्हान असणार आहे. नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार समोरासमोर आल्याचं पाहायला मिळत आहे. चौरंगी लढतीत कोण बाजी मारतं याबाबत उत्सुकता असणार आहे.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे. या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon :खडसेंच्या घरात चोरी! ५ तोळं सोनं आणि ३५ हजार लंपास; एकनाथ खडसे म्हणाले, जळगावात पोलिसांचा धाक राहिला नाही

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात कृषी केंद्रचालकांचं आंदोलन; ‘साथी पोर्टल’च्या विरोधात एक दिवस केंद्र बंद

Ranji Trophy 2025: पावसाच्या व्यत्ययात मुंबई संघाची कसरत; छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात आघाडीसाठी आता चार विकेटची गरज

UP Encounter: योगींच्या पोलिसांनी एका शहरात केले डबल एनकाऊंटर! तिघांच्या पायाला गोळी; गुन्हेगारीचा मोठा इतिहास!

Arjun Tendulkar: 4,4,4,4,4,4,6! अर्जुनच्या फटकेबाजीमुळे गोवा संघाचा कमबॅक; आधी ३ विकेट्स घेऊन कर्नाटकला दिलेले धक्के...

SCROLL FOR NEXT