Former MLA Nanasaheb Boraste speaking at the meeting of Teachers' Democratic Alliance. Neighbors Ravindra More, Hiralal Pagdal, N. D. Nandra. esakal
नाशिक

Teachers Constituency Election: शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार शिक्षकच हवा : नाशिक विभाग TDFच्या बैठकीत सूर

Political News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार हा शिक्षकच असायला हवा, असा सूर नाशिक शिक्षक लोकशाही आघाडीच्या बैठकीत उमटला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार हा शिक्षकच असायला हवा, असा सूर नाशिक शिक्षक लोकशाही आघाडीच्या बैठकीत उमटला. पुणे येथे झालेल्या बैठकीत नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली. (nashik Teachers Constituency Election candidate must be teacher decision division TDF meeting marathi news)

नाशिक विभाग तसेच मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची सहविचार सभा आझम कॅम्पस, पुणे येथे राज्याचे अध्यक्ष आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सभेची सुरवात नाशिक विभागाचे ‘टीडीएफ’चे अध्यक्ष बादशाह शेख यांना श्रद्धांजली वाहून तसेच आजम कॅम्पसच्या वतीने राज्याचे अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांचा राज मुजावर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आली. सभेच्या सुरवातीलाच शिक्षक लोकशाही आघाडीचे महासचिव हिरालाल पगडाल यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून सर्वांच्या सहमतीने कायम केले.

या सभेत प्रामुख्याने नाशिक विभाग व मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत तसेच उमेदवारीबाबत चर्चा झाली. दोन्ही विभागांमध्ये उमेदवार हा शिक्षकच असावा, असे एकमताने ठरविण्यात आले. प्रामुख्याने नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील विविध शैक्षणिक समस्या तसेच जिल्हा निवडणुकीचा आढावा राज्य कार्यकारिणीसमोर मांडला.

राज्याचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात, विश्वस्त के. एस. ढोमसे यांनी रत्नागिरी येथे झालेल्या बैठकीचा इतिवृत्तात सभेपुढे मांडून येणाऱ्या काळामध्ये संघटना बांधणीसाठी योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेऊन आपले मत व्यक्त केले.

डॉ. एन. डी. नांद्रे, राज्य सहसचिव, आर. एच. बाविस्कर (जळगाव), निशांत रंधे (धुळे), संदीप घोरपडे (अमळनेर), सुरेश पाटील (संगमनेर), अरविंद कडलक, नरेंद्र पाटील (नंदुरबार), संजय पवार (नाशिक), राजेंद्र लांडे, आबासाहेब कोकाटे (अहमदनगर), राज्य संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य, विभाग अध्यक्ष व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT