winter 
नाशिक

Nashik Winter Update: जिल्ह्यात थंडीचा तडाखा वाढला; धुक्यामुळे शेतीची चिंता वाढली

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update: शहरासह जिल्‍हाभरात थंडीचा तडाखा वाढत असून, दिवसाच्‍या वेळीही वातावरणात गारवा जाणवतो आहे. सायंकाळनंतर वातावरणातील शीतलहरींमुळे गारठ्याची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवते. (nashik Temperature at 14 degrees news)

मंगळवारी (ता. १२) नाशिकचे किमान तापमान १४ अंश सेल्‍सियस नोंदविले गेले. दरम्‍यान, वातावरणात दव व धुके निर्माण होत असल्‍याने यामुळे शेती पिकांची चिंता वाढली आहे. येत्‍या काही दिवसांत पारा आणखी खालावण्याची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तविली.

यंदाच्‍या हिवाळी हंगामात आतापर्यंत अपेक्षित थंडी जाणवत नव्‍हती. अशात अवकाळी पावसाने संपूर्ण वेळापत्रक विस्कळित केले होते. ढगाळ वातावरण राहत असल्‍याने वातावरणातील गारवा कमी झाला होता; परंतु गेल्‍या काही दिवसांपासून गारवा पुन्‍हा जाणवू लागलेला आहे. मंगळवारी नाशिकचे किमान तापमान १४ अंश सेल्‍सियस नोंदविले गेले.

तत्‍पूर्वी, सोमवारी (ता. ११) नाशिकचे तापमान १६.२ अंश सेल्‍सियस असताना एका दिवसात पाऱ्याची दोन अंशांहून अधिकच घसरण झाली. सध्याच्‍या वातावरणात हवेत दव आणि मध्यरात्रीपासून पडणारे धुके यामुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः टोमॅटो पिकावर सध्याच्‍या वातावरणाचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे.

राज्‍यात नाशिक तिसऱ्या स्‍थानी

संपूर्ण राज्‍यभर थंडीचा परिणाम जाणवतो आहे. मंगळवारी सर्वांत कमी किमान तापमान १३ अंश सेल्सियस हे चंद्रपूरचे राहिले. त् ‍याखालोखाल गोंदियाचे १३.२ अंश सेल्‍सियस तापमान नोंदविले गेले. १४ अंश सेल्‍सियस तापमान असलेले नाशिक थंडीच्‍या बाबतीत राज्‍यात तिसऱ्या स्‍थानी राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT