३०-२
नाशिकच्या कमाल तापमानात
एका रात्रीतून ५ अंशांची वाढ
पारा ३३.३ अंशांवर, किमान तापमानात मात्र घसरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३ ः उन्हाच्या कडक झळांमुळे एका दिवसात नाशिकच्या कमाल तापमानामध्ये तब्बल ५ अंश सेल्सिअसची वाढ नोंदविली आहे. सोमवारी (ता. २) नाशिकचे कमाल तापमान २८.४ अंश असताना, मंगळवारी (ता.३) ते ३३.३ अंश नोंदविले गेले आहे. याउलट कमाल तापमानात घसरण होऊन १८.३ अंश सेल्सिअसची नोंद घेतली आहे.
नाशिकमध्ये सोमवारी सकाळी ढग दाटून आले होते. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता असताना, दुपारनंतर आकाशातून ढग गायब झाले होते. मंगळवारी सकाळी साडेआठपासून उन्हाच्या झळा जाणवत होत्या. दुपारी १२ ते ३ यादरम्यान उन्हाची तीव्रता सर्वाधिक होती. काही दिवसांपासून वातावरणीय बदलांमुळे तापमानात मोठी चढ- उतार सुरु आहे. उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याने येत्या काही दिवसांत कमाल तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
---
१६-१
आरोग्याचा प्रश्न
एकीकडे कमाल तापमान वाढत असताना, दुसरीकडे किमान तापमानात घसरण नोंदविली आहे. त्यामुळे दुपारी कडक उन आणि रात्री काही प्रमाणात गारवा जाणतो आहे. अशा वातावरणातील विषमतेमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोग्य सांभाळण्याचा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.