Zilla Bank administrator and CEO get death threats on WhatsApp esakal
नाशिक

Nashik News : जिल्‍हा बँकेचे प्रशासक, सीईओंना ठार मारण्याची धमकी!

Nashik News : नाशिक जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्‍हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पाटील यांना ठार मारण्याची धमकी दिल्‍याचा प्रकार समोर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील नाशिक जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्‍हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पाटील यांना ठार मारण्याची धमकी दिल्‍याचा प्रकार समोर आला आहे. बँकेत तात्‍पुरते कार्यरत कर्मचाऱ्यांच्‍या व्‍हॉट्‌सअप ग्रुपवरील चर्चेत ही धमकी दिल्‍याचे समोर आले आहे. यासंदर्भात बँकेमार्फत भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Threat to kill District Bank administrator and CEO)

भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्‍या नावाने हे निवेदन दिले आहे. निवेदनात म्‍हटले आहे, की नाशिक जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्‍हाण व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी संजय पाटील कार्यरत आहेत. बँकेत तात्‍पुरते स्वरूपात काम करणाऱ्या चारशे कर्मचाऱ्यांना कायम करण्याची याचिका मे. औद्योगिक न्‍यायालयात रद्द ठरविण्यात आली.

यानंतर यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी उच्च न्‍यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना कायम केले जाऊ शकत नाही. व त्‍यांची पगारवाढ किंवा अन्‍य फायदेदेखील त्‍यांना देता येणार नाही. (latest marathi news)

परंतु या कर्मचाऱ्यांनी त्‍यांच्‍या एकत्रित चर्चा करून कारवाई करण्यासाठी व्‍हॉट्‌सअपवर ग्रुप तयार केलेला आहे. या ग्रुपवर कारवाईसंदर्भातील माहितीची देवाणघेवाण सुरू असते. या ग्रुपवरील चर्चेची संवादाची प्रत बँकेला मिळाली आहे. या संवादात नमुद केल्‍यानुसार ‘बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पाटील यांचा खून करून टाका’, असा धमकीचा मेसेज प्रसारित करताना प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी असल्‍याचे नमूद केले होते.

यासोबतच सीईओ प्रतापसिंह चव्‍हाण यांचा खून करण्याबाबतही मजकूर इंग्रजीत नमूद केला आहे. या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत, संबधितांवर कायदेशीर कारवाई करावी असे नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT