Sarvapitri Amavasya esakal
नाशिक

Nashik : आजच्या सर्वपित्री अमावस्येने पितृपक्षाची समाप्ती; उद्या घटस्थापना, भाविकांसह महिलांमध्ये विशेष उत्साह

Nashik : सर्वपित्री अमावस्येने पितृपक्षाची समाप्ती होत आहे. गुरुवारच्या घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वास प्रारंभ होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बुधवार (ता.२) च्या सर्वपित्री अमावस्येने पितृपक्षाची समाप्ती होत आहे. गुरुवारच्या घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वास प्रारंभ होत आहे. यामुळे भाविकांत विशेषतः महिला भाविकांत मोठा उत्साह आहे. ज्यांच्या पितरांच्या जाण्याची तारीख निश्‍चित माहिती नसते किंवा काही अडचणी व कारणांमुळे पंधरा दिवसांत पित्र करता आले नाही, असे सर्वजण सर्वपित्री अमावस्येला पितरांचे श्राद्ध करतात. ( Today Sarvapitri Amavasya marks end of Pitru Paksha )

पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने यादिवशी श्राद्ध, पिंडदान व तर्पण विधी केला जातो. पंचागांनुसार मंगळवारी (ता.१) रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी अमावस्या सुरू होईल तर ३ तारखेला दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी संपेल.

सर्वपित्री श्राद्धविधी असा

पितरांचे तर्पण करताना दक्षिणेकडे तोंड करावे. त्यानंतर अंगठा व पहिल्या बोटाच्या मदतीने पाणी अर्पण करावे तर्पणविधीसाठी कुश, अक्षता, जव व काळे तीळ वापरून पितरांचे स्मरण करावे. त्यानंतर उत्तरेकडे तोंड करून जव व कुश यांचा नैवेद्य दाखवावा. शेवटी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना काळे तीळ व कुश अर्पण करावेत. तर्पण विधीनंतर गरजूंना अन्नदान करावे, त्यामुळे पितर प्रसन्न होतात, असे मानले जाते. (latest marathi news)

घटस्थापना

घटस्थापना गुरुवारी (ता.३) असून पुढील नऊ दिवस महिलांचे व्रतवैकल्ये व उपवास असतात. त्यामुळे बाजारात विविध फळे, उपवासाच्या पदार्थाच्या मागणीत वाढ होईल. उपवासासाठी साबुदाणा खिचडी, भगर, राजगिरा लाडूंसह केळी, सफरचंद, खजूर आदी सर्व प्रकारच्या फळांच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी या सर्वांच्या दरांत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे.

कालिकोत्सव तयारी पूर्ण

ग्रामदैवत श्री कालिका यात्रेस गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. पुढील दहा दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासनाने सर्व तयारी केली असून संपूर्ण परिसर रोषणाईने झळाळून जाणार आहे. यात्रोत्सवातून लाखो रुपयांची उलाढालही होणार आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात येणार असून व्यावसायिकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT