Majhi Vasundhara Abhiyan 4.0 esakal
नाशिक

Majhi Vasundhara Abhiyan 4.0 : माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये नाशिकचा डंका! 14 बक्षीसे मिळवत चौथ्या वर्षीही राज्यात अग्रेसर

Latest Nashik News : माझी वसुंधरा अभियान सुरू झाल्यापासून या अभियानात राज्यस्तरीय पुरस्कारात नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक राहिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा ४.०’ २०२३-२४ स्पर्धेत नाशिक जिल्हा परिषदेने १४ बक्षीस प्राप्त केली आहेत. या अभियानात सलग चौथ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय तसेच विभागस्तरीय बक्षीस मिळविले आहे.

तसेच, अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनाही पुरस्कार जाहीर झाला. माझी वसुंधरा अभियान सुरू झाल्यापासून या अभियानात राज्यस्तरीय पुरस्कारात नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक राहिला आहे. (Nashik top in Majhi Vasundhara Abhiyan)

जाहीर झालेले पुरस्कार

सर्वोत्तम कामगिरी राज्यस्तरीय तृतीय बक्षीस - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

दीड हजार ते अडीच हजार लोकसंख्या गटात

राज्यस्तरावर- मोडाळे ग्रा. पं. (प्रथम क्रमांक)

भोकणी ग्रा. पं. (तृतीय क्रमांक)

भूमी थिमॅटीक गटात

राज्यस्तरीय- मोडकी ग्रा. पं. (प्रथम क्रमांक)

दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात

राज्यस्तरावर- आवळी दुमाला (द्वितीय क्रमांक)

भूमी थिमॅटिक गटात

राज्यस्तर- आवळी दुमाला ग्रा. पं. (प्रथम क्रमांक)

दहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या गटात

राज्यस्तरावर- पिंपरी सय्यद (पाचवा क्रमांक) (उत्तेजनार्थ)

२५०० ते ५००० लोकसंख्या गटात

राज्यस्तर- ढकांबे (उत्तेजनार्थ बक्षीस)

१५०० पेक्षा कमी लोकसंख्या गटात

राज्यस्तर- पिंपळगाव डुकरा (उत्तेजनार्थ बक्षीस)

विभागस्तरीय बक्षीस

दहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या गट

चांदोरी ग्रा. पं. (द्वितीय क्रमांक)

५००० ते १०,००० लोकसंख्या गटात

न्यायडोंगरी ग्रा. पं. (तृतीय क्रमांक)

१५०० ते २५०० लोकसंख्या गटात

विभागात- दरी ग्रा. पं. (प्रथम क्रमांक)

गिलाणे ग्रा. पं. (द्वितीय क्रमांक)

१५०० पेक्षा कमी लोकसंख्या गटात

विभागात- शिरसाठे ग्रा. पं. (द्वितीय क्रमांक)

"पुढील वर्षासाठीचेही सूक्ष्म नियोजन करून व मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेऊन जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळविण्याचे लक्ष आहे."

- दीपक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT