नाशिक

सकाळ दिवाळी अंक प्रकाशन

CD
NSK26H34627 नाशिक : सकाळ दिवाळी अंकाच्या पुस्तक प्रकाशन करताना महापौर हिमगौरी आडके-आहेर, दैनिक ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) मारुती दातीर, शब्दमल्हार प्रकाशनचे स्वानंद बेदरकर, ‘तान’चे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव, वास्तुविशारद शाम लोंढे, आयएमए अध्यक्ष डॉ. विशाल पवार, सामाजिक कार्यकर्ते अजित चव्हाण, प्रिन्सिपल कॉरस्पॉन्डंट विक्रांत मते. ------- मुख्य अंक पान ३ साठी --------- नाशिकच्या पर्यटन वैभवाला नवी झळाळी ----------- मान्यवरांचे मत ः ''सकाळ''च्या पर्यटन विशेषांक दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन ----------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६- उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला अधिक व्यापक उंचीवर नेण्यासाठी दैनिक ''सकाळ''च्या पर्यटन विषयावर आधारित दिवाळी अंकाचे शुक्रवारी (ता. ६) प्रकाशन करण्यात आले. कालिका प्लाझा येथील ''सकाळ''च्या कार्यालयात कार्यक्रम झाला. या विशेषांकात खाद्यसंस्कृती, निसर्गरम्य स्थळे, धार्मिक महत्त्व, ट्रेकिंगचे मार्ग, वाइन पर्यटन आणि चित्रीकरणासाठी उपलब्ध पोषक वातावरण यांसारख्या विविध घटकांना अंकात अभ्यासपूर्ण रीतीने अनुभवी लेखकांनी मांडलेले आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराचा होत असलेला सर्वांगिण विकास आणि जागतिक पातळीवर नाशिकची पर्यटनाच्या दृष्टीने होणारी ओळख या अंकामुळे अधिक दृढ होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर हिमगौरी आडके- आहेर, शब्दमल्हार प्रकाशनचे स्वानंद बेदरकर, ‘तान’चे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव, वास्तुविशारद शाम लोंढे, आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. विशाल पवार, सामाजिक कार्यकर्ते अजित चव्हाण आदी उपस्थित होते. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर यांनी प्रास्ताविक केले. कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून होत असलेल्या विकासामुळे आगामी काळात नाशिक पर्यटनाचे केंद्र तयार होत असल्याने विविध अंगाने त्याचा दिवाळी अंकात वेध घेतल्याचे सांगितले. श्री. भालेराव म्हणाले, शहर व जिल्ह्यात पर्यटन क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. ती अधिक गतिमान व प्रभावीपणे अधोरेखित होणे गरजेचे आहे. त्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याची ओळख केवळ नाशिक पुरता न राहता महाराष्ट्राचा कुंभमेळा व्हावा. श्री. लोंढे म्हणाले, चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावे शहराची ओळख निर्माण झाली पाहिजे. पर्यटनाच्या क्षमतेला चालना मिळाली पाहिजे. डॉ. पवार यांनी गेल्या दहा वर्षात शहराने ‘मेडिकल टुरिझम’साठी मोठी भरारी घेतल्याचे नमूद केले. बेदरकर यांनी, दिवाळी अंकाची परंपरा केवळ महाराष्ट्रात असून ती परंपरा आजतागायत जपली जात आहे. ‘सकाळ’ने नेहमीच नवोदित लेखकांना संधी देऊन लिहिते केले आहे. त्याचा मी सुद्धा एक घटक असल्याची आठवण सांगितली. सरव्यवस्थापक संजय पाटील यांनी आभार मानले. ------------चौकट----------------- २०-२ शहर विकासासाठी सहकार्य गरजेचे : महापौर सिंहस्थ कुंभमेळ्यात होत असलेल्या कामांचा भाग म्हणून सुरू असलेल्या विकासकामांकडे न पाहता भविष्याच्या दृष्टीने निर्माण होत असलेल्या कायमस्वरूपी सुविधा व शहराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने बघावे, शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. कुंभमेळा असो किंवा शहराचा पर्यटन विकास या सर्व योजनांचा लाभ नाशिकच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी होईल.  सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नाशिकच्या विकासाला हातभार लावावा. शहरातील उद्योजक, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागातूनच नाशिकला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक आदर्श शहर म्हणून ओळख मिळवून देता येईल.  राजकीय सीमांपलीकडे जाऊन केवळ ''नाशिककर'' म्हणून एकत्र येण्याची हीच खरी वेळ असल्याचे सांगत महापौर हिमगौरी आडके- आहेर यांनी भविष्यात येऊ घातलेल्या अनेक याेजनांची माहिती देताना ‘सकाळ’चा पर्यटन दिवाळी विशेषांक पर्यटनाच्या विकासाला हातभार लावेल असा विश्‍वास व्यक्त केला. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

Breast Cancer: स्तनाचा कर्करोग एकच, पण उपचार वेगवेगळे! प्रत्येक महिलेसाठी स्वतंत्र उपचारयोजना का महत्त्वाची?

SCROLL FOR NEXT