noise pollution sakal
नाशिक

नाशिकची वाटचाल अशांत शहराकडे

शहरात अवघे १९ शांतता झोन; भोंग्याच्या राजकारणामुळे विषय चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मंदिर, मशिदीवरील भोंग्याच्या राजकारणामुळे ध्वनिप्रदूषणाचा विषय चर्चेत आला आहे. परंतु, ध्वनिक्षेपकच नव्हे तर वाहनांच्या ध्वनिप्रदूषणाचा विषय खरोखरच गंभीर होत चालला आहे. महानगराकडे वाटचाल करणाऱ्या आणि राज्यातील शांत शहर, अशी प्रतिमा असलेल्या २० लाख लोकसंख्येच्या नाशिकला शांतता झोन किती, तर अवघे १९ असे त्याचे उत्तर आहे.

दोन महामार्ग आणि येत्या काळात सूरत- चेन्नईसह टायरबेस मेट्रो, सेमी हायस्पीड रेल्वे यासह दिवसागणिक वाढणाऱ्या लाखो वाहनांच्या ध्वनिप्रदूषणामुळे नाशिकची वाटचाल अशांत शहरांकडे सुरू आहे. महापालिकेच्या पाहणीनुसार नाशिक शहरात अवघे १९ शांतता झोन असून, त्यातील ध्वनिप्रदूषणाची पातळी शांतता झोनसाठी अभिप्रेत असलेल्या निकषापेक्षा कितीतरी अधिक आहे. नाशिकच्या कुठल्याही शांतता झोनमध्ये व्यावसायिक व औद्योगिक झोनइतके ध्वनिप्रदूषण रोज सुरू असते, इतकी विदारक स्थिती आहे.

शांतता झोनचे निकष

महाराष्ट्र ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियम) नियम २००९ च्या कलम ३ (५) नुसार महापालिकेने ७ नोव्हेंबर २००९ पासून शांतता झोन निश्चित केले आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाच्या निकषानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व शांतता झोनमध्ये ध्वनिप्रदूषणाची तीव्रता किमान ४० ते कमाल ४५ डेसिबल दरम्यान हवी. त्याहून अधिक ध्वनिप्रदूषण होत असल्यास किंवा ध्वनिप्रदूषणाची पातळी राखली जात नसेल तर हे झोन संबंधित शांतता झोनमध्ये न मोडता तो ध्वनिप्रदूषण तीव्रतेनुसार व्यावसायिक किंवा प्रसंगी औद्योगिक झोनमध्ये समाविष्ट करणे अभिप्रेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT