Ganesh Wadi: A flower statue of the Mahatma erected here.  esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्याने जपल्‍या महात्‍मा फुलेंच्‍या खुणा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या हस्‍ते झाले होते पुतळ्याचे अनावरण

Latest Nashik News : शहरात व जिल्ह्यात महत्त्वाच्‍या ठिकाणी पुतळे उभारलेले आहेत. शाळा, महाविद्यालय, सभागृह, दालनाला महात्‍मा फुले यांचे नाव दिले आहे. त्‍यांच्‍या विचाराने महात्‍मा फुले समता परिषदेची स्‍थापनाही याच भूमीतून झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वेगवेगळ्या माध्यमातून महात्‍मा जोतिबा फुले यांच्या खुणा जिल्‍हावासीयांनी जपल्‍या आहेत. स्‍वातंत्र्य काळादरम्‍यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या हस्‍ते गणेशवाडीत महात्‍मा फुले यांच्‍या पुतळ्याचे अनावरण झाले होते. यानंतरही शहरात व जिल्ह्यात महत्त्वाच्‍या ठिकाणी पुतळे उभारलेले आहेत. शाळा, महाविद्यालय, सभागृह, दालनाला महात्‍मा फुले यांचे नाव दिले आहे. त्‍यांच्‍या विचाराने महात्‍मा फुले समता परिषदेची स्‍थापनाही याच भूमीतून झाली आहे. (Traces of Mahatma Phule preserved by district)

गणेशवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या उपस्‍थितीत महात्‍मा फुले यांच्‍या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. यानंतरच्‍या काळात महालक्ष्मी चौकातही महात्‍मा फुले यांचा पुतळा उभारण्यात आला. भद्रकालीतील फुले मंडई एकेकाळी वर्दळीचे ठिकाण राहायची.

या ठिकाणीही महात्‍मा फुले यांचा पुतळा उभारलेला आहे. जिल्ह्यातील जवळपास प्रत्‍येक तालुक्‍यात महात्‍मा फुले यांचा पुतळा उभारलेला आहे. आडगाव येथील मेट भुजबळ नॉलेज सिटी प्रांगणातही शिल्‍पकृती लक्षवेधी ठरतात.

महात्‍मा फुले यांच्‍या विचारांनी प्रेरित होऊन नाशिकच्‍या भूमीतूनच महात्‍मा फुले समता परिषदेची स्‍थापना झाली असून, हे संघटन राष्ट्रीय स्‍तरापर्यंत पोहोचले आहे. दरम्‍यान, वैचारिक मंथन घडविणाऱ्या वास्‍तूंनाही महात्‍मा फुले यांचे नाव देत शोभा वाढविलेली आहे. येवला तालुक्‍यात महात्‍मा फुले नाट्यगृह कार्यरत आहे. नाशिक शहरात शालिमारला महात्‍मा फुले कलादालन उभारलेले आहे.

एकनाथ शिंदेंच्‍या हस्‍ते यापूर्वीही पुतळ्याचे अनावरण

एकनाथ शिंदे हे नगरविकासमंत्री असताना डिसेंबर २०१६ मध्ये त्‍यांच्‍या हस्‍ते टाकळी येथे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या महात्‍मा फुले यांच्‍या पुतळ्याचे अनावरण झाले होते. राहुल दिवे नगरसेवक असताना महापालिकेतर्फे हा पुतळा उभारला होता. चौदा फूट उंचीचा हा पुतळा असून, चबुतऱ्यासह पुतळ्याची उंची ३५ फूट आहे. या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्‍हणजे पुतळ्याच्‍या मागील बाजूला पुस्‍तकाची मोठी शिल्‍पाकृती असून, शिक्षकाची कवाडे उघडी केल्‍याचे स्‍मरण यानिमित्त केले आहे. (latest marathi news)

शैक्षणिक संकुलात फुले यांची कीर्ती

माजी खासदार यादवराव नारायणराव जाधव (या. ना. जाधव) यांनी महात्‍मा जोतिबा फुले शिक्षण संस्‍थेची स्‍थापना केली. या संस्‍थेची इमारत सप्‍टेंबर १९६९ मध्ये आलेल्‍या पुरात वाहून गेली होती. यानंतर त्‍यांनी विद्यार्थ्यांबरोबर मिळून श्रमदानातून इमारत उभी केली होती. राज्‍यस्‍तरावर विस्‍तार असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्‍या नावाने अध्यासन कार्यरत आहे.

नंतरच्‍या कालावधीत विविध स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या शाळांना महात्‍मा फुले यांचे नाव दिलेले आहे. यापैकी नाशिक महापालिकेच्‍या शाळांचाही समावेश आहे. याशिवाय, सावित्रीबाई फुले यांच्‍या नावानेही काही शाळा कार्यरत आहेत. महात्‍मा फुले समाज शिक्षण संस्थेंतर्गत वरिष्ठ महाविद्यालय कार्यरत आहे. काही खासगी वाचनालयांनाही महात्‍मा फुले यांचे नाव दिलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT