नाशिक

शहराला नवरात्रोत्सवात वाहतूक कोंडीचा विळखा

CD
फोटो : H32073 -- प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त वाहनांच्या लांबच लांब रांगा; पोलिसांचे नियोजन कोलमडले सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : नवरात्रोत्सवाचा उत्साह आणि त्यातच विविध विकासकामांची संथगती यामुळे नाशिककरांना सध्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः कालिकादेवी यात्रा आणि शहरातील प्रमुख रस्त्यांचे सुरू असलेले काँक्रिटीकरण यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, सायंकाळी मुख्य चौकांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. गडकरी चौक ते महामार्ग बसस्थानक यादरम्यान कालिकादेवीचा पारंपरिक यात्रोत्सव सुरू आहे. या यात्रोत्सवामुळे रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यातच गडकरी चौक ते त्र्यंबक नाका दरम्यानचा रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामामुळे बंद असल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. त्र्यंबक नाका ते गडकरी चौक यादरम्यान एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने येथे नेहमीच वाहनांची गर्दी होत असून अपघाताची भीती व्यक्त होत आहे. मुंबई नाक्याकडून पंचवटीकडे येणारी वाहने आता तिडके कॉलनी, चांडक सर्कल मार्गे मायको सर्कल आणि पुढे गडकरी चौकाकडे वळवली आहेत. यामुळे या पर्यायी मार्गांवरील ताण अचानक वाढला असून गडकरी चौकात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. संध्याकाळनंतर नवरात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आणि गरबा, दांडिया खेळण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची आणि तरुणाईची संख्या लक्षणीय असल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहनांचीही प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अशोकस्तंभ, मखमलाबाद नाका, मेहेर सिग्नल, रविवार कारंजा, जुना गंगापूर नाका, कॉलेज रोड, महात्मानगर, एबीबी सर्कल यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणांसह सिडको, सातपूर, पंचवटी आणि गंगापूर रोड या प्रमुख उपनगरांमध्येही वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण असल्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या वाहनचालकांना नवरात्रोत्सवाच्या दिवसांत या कोंडीतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने तात्काळ या वाहतूक व्यवस्थेत योग्य ती सुधारणा करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ---चौकट वाहतूक पोलिसांची धावपळ वाहतूक पोलिसांची कसरत आणि धावपळ होत आहे. प्रमुख चौक व बंद असलेल्या रस्त्यांच्या वळणावर अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दीच्या आणि सायंकाळच्या वेळी वाहतूक सुरळीत ठेवताना पोलिसांना नाकी नऊ येत असून, मुख्य मार्गांवरील कोंडी फोडण्यासाठी पोलिस यंत्रणा दिवस-रात्र मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT