Video Viral  Sakal
नाशिक

Video Viral : 'ट्रीपल सीट बसू नका, हेल्मेट घाल रे!' सिग्नलवर घुमला कंट्रोल रूमचा आवाज; नाशिक पोलिसांची भन्नाट कल्पना

सकाळ डिजिटल टीम

Nashik News: वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी भन्नाट कल्पना राबवली आहे. थेट सिग्नल असलेल्या चौकामध्येच भोंगे लावून वाहन चालकांना कंट्रोल रूममधून सूचना देण्यात येत आहेत. तर यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे वाहन चालकांकडून पालन होताना दिसत आहेत.

नाशिक शहरातील एमजी रोडच्या एका बाजूला असलेल्या सिग्नलवरील व्हिडिओ आणि कंट्रोल रूममधील पोलिसांच्या कामकाजाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौकातील दिसणाऱ्या लाईव्ह दृश्यावरून पोलिसांकडून सूचना देण्यात येत आहेत. विरूद्ध दिशेने प्रवास, तीन जण एका गाडीवर बसणे, सिग्नल तोडून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत.

दरम्यान, नाशिक पोलिसांनी हा अनोखा प्रयोग राबवला असून यामुळे वाहतूकीवर नियंत्रण राहणार आहे. त्याचबरोबर या उपक्रमामध्ये एक कर्मचारी एकापेक्षा अधिक चौकातील वाहतुकीवर लक्ष ठेवून योग्य ते निर्देश देऊ शकतो. कंट्रोल रूमध्ये सगळ्या चौकातील सीसीटीव्हीचे कॅमेऱ्याचे एक्सेस असल्यामुळे एका ठिकाणाहून कोणत्या चौकात काय बदल करायचे हे ठरवता येऊ शकते.

त्याचबरोबर भोंग्यामुळे नागरिकांमध्येही नियम पाळण्याची शिस्त लागू शकते. आपल्याला कुणीतरी बघत आहे ही भिती असल्यामुळे नियमांचे पालन होऊ शकते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT