Traffic Police Take action through 'e-challan' machine  esakal
नाशिक

Nashik Traffic Police: मोबाईलने नव्हे तर, ‘इ-चलन’ मशिनद्वारे करा कारवाई; वाहतूक पोलिसांच्या हाती दिसू लागले ‘इ-चलन’ मशिन

Traffic Police : बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करताना शहर वाहतूक पोलिसांकडून इ-चलन मशिनऐवजी मोबाईलचा वापर केला जात असल्याचे वृत्त ‘दैनिक सकाळ’मधून प्रसिद्ध झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Police : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करताना शहर वाहतूक पोलिसांकडून इ-चलन मशिनऐवजी मोबाईलचा वापर केला जात असल्याचे वृत्त ‘दैनिक सकाळ’मधून प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकार्यांनी वाहतूक पोलिसांना दंडात्मक कारवाईसाठी इ-चलन मशिनचाच वापर करण्याचे आदेश दिले. (Nashik Traffic Police Take action through e challan machine marathi news)

त्यानुसार, आता वाहतूक पोलिसांच्या हाती इ-चलन मशिन दिसू लागले आहेत. राज्य महामार्ग वाहतूक विभागाचा ‘वन नेशन - वन चलन’ हा पायलट प्रोजेक्ट नाशिक शहरात राबविला जात आहे. त्यानुसार, शहर पोलिसांच्या हाती बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी आधुनिक स्वरुपाचे इ-चलन मशिन देण्यात आलेले आहे.

परंतु या मशिनमध्ये असलेल्या काही त्रुटींमुळे ते प्रत्यक्ष कामकाजावेळी वाहतूक पोलिसांना अडचणीचे ठरत होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी इ-चलन मशिनऐवजी मोबाईलचा वापर बेशिस्त वाहनचालकांचे फोटो काढण्यासाठी केला. यासंदर्भातील छायाचित्रांसह बातमी ‘दैनिक सकाळ’मधून गेल्या आठवड्यात (ता. २३) प्रसिद्‌ध झाली होती. (latest marathi news)

या बातमीची शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी गांभीर्याने दखल घेत वाहतूक शाखेच्या अंमलदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई करताना मोबाईल न वापरण्याची ताकीद देतानाच, इ-चलन मशिनचाच वापर करावा असे आदेश दिले होते. तसेच, इ-चलन मशिनसंदर्भात असलेल्या त्रुटी या संबंधित कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

त्यासंदर्भात पाठपुरावाही शहर वाहतूक शाखेकडून केला जात आहे. वाहतूक शाखेच्या उपायुक्तांच्या या आदेशामुळे शहरात ठिकठिकाणी बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई करणार्या वाहतूक अंमलदारांच्या हाती मोबाईल नव्हे तर इ-चलन मशिन दिसू लागले आहेत. चौका-चौकात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलीस इ-चलन मशिनद्वारेच दंडात्मक कारवाई केली जात आहे.

''कोणत्याही परिस्थितीमध्ये वाहतूक अंमलदारांनी बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करताना इ-चलन मशिनचाच वापर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू झाली आहे.''- चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा उभारतानाची दृष्य! पुण्यातील १९२८ ची ऐतिहासिक मिरवणूक, ९७ वर्षांनंतरही... Video पाहा

Ranji Trophy: "मुंबईचा रणजीत धडाका! सहाशे धावांचा डोंगर; सिद्धेशचे दीडशतक, सर्फराझ, शार्दुलचीही अर्धशतके

Teachers Suspended:'अहिल्यानगरमधील दोन परित्यक्ता शिक्षिका निलंबित';बदलीसाठी माेठा बनाव, शिक्षण क्षेत्रात खळबळ..

Female Aggressive:'ग्रामस्थ-वनअधिकाऱ्यांत रणकंदन'; नगर तालुक्यातील महिला आक्रमक, पकडलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारा

Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी पुन्हा रंगभूमीकडे, लेक आशीचं ‘लैलाज’ नाटकातून रंगभूमीवर पदार्पण

SCROLL FOR NEXT