नाशिक

ट्रॅफिक वॉर्डनला चाकू दाखवून खूनाची धमकी

CD
ट्रॅफिक वॉर्डनला खुनाची धमकी वडाळा नाक्यावरील घटना : गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : वडाळा नाका चौफुलीवर वाहतुकीचे नियंत्रण करीत असताना संशयित चारचाकी कार चालकाने ट्रॅफिक वॉर्डनच्या अंगावर कार घालण्याच प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:कडील चाकूचा दाखवत ‘खून’ करण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयित कारचालकाविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर शरद पगारे (२३, रा. जाखोरी, ता. जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ते ट्रॅफिक वॉर्डन म्हणून कार्यरत आहेत. गेल्या शुक्रवारी (ता. २) सायंकाळी वडाळा नाका चौफुली येथे ते वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नियुक्तीवर होते. त्यावेळी नागजी सिग्नलकडून सारडा सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी ते वाहतूक नियंत्रण करीत होते. त्याचवेळी संशयित कार (एमएच ०४ जीई २०७४) चालकाला त्यांनी रोखले असता, त्याचा कारचालकाला राग आल्याने त्याने कार थेट वॉर्डनच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच, कारमधनू खाली उतरून त्याने ‘तू पोलिस आहेस का? तुला माझी गाडी थांबवण्याचा काय अधिकार आहे? असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच, शासकीय कामात अडथळा आणून वॉर्डनच्या शर्टची कॉलर पकडत मारहाण करीत, त्याच्याकडील चाकू दाखवून ‘तुझा मर्डर करतो’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT