ear tagging esakal
नाशिक

Nashik News : ‘ईअर टॅगिंग’शिवाय जनावरांची वाहतूक बंद; 1 जूनपासून अंमलजावणी

Nashik : जनावरांची बेकायदा होणारी वाहतूक रोखण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ‘ईअर टॅगिंग’शिवाय इतर राज्यांतील जनावरे महाराष्ट्रात येण्यास बंदी घातली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जनावरांची बेकायदा होणारी वाहतूक रोखण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ‘ईअर टॅगिंग’शिवाय इतर राज्यांतील जनावरे महाराष्ट्रात येण्यास बंदी घातली आहे. तसेच, १ जूनपासून ईअर टॅग नसलेली जनावरे बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावांतील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केल्याने बेकायदा कत्तलींना आळा बसेल. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने ‘नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली’ कार्यान्वित केली आहे. ( Transport of animals stopped without ear tagging )

या प्रणालीत ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोड)च्या नोंदी घेण्यात येत आहेत. यात जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत जनावरांच्या कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होईल. जेणे करून पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता मदत होणार आहे.

ई-टॅगशिवाय शासकीय मदतही नाही

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका यांना पशुधनाची ईअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक आहे. १ जून २०२४ नंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. तसेच, कत्तलखान्यात टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी मिळणार नाही. (latest marathi news)

नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का व वन्य पशूच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. परराज्यांतून येणाऱ्या पशुधनास ईअर टॅगिंग केल्याची व त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावी.

''ग्रामपंचायतीत पशूंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देऊ नये. दाखल्यावर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा. पशुसंवर्धन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी नाशिक जिल्ह्यातील सर्व अनुषांगिक प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे करावी.''- जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

Shaktipith project : इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रभाव; शक्तिपीठ प्रकल्पासाठी कडक निकष, २५ गावांसाठी अधिसूचना

Mumbai Crime: मुंबई जैन मंदिरातील दीड कोटींची चोरी उघड; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘चंबळ’तील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद!

अजय देवगणसाठी तब्बू झालेली वेडी! एक दोन नाहीतर 'या' ९ अभिनेत्रींसोबत अजयचं सुरू होतं प्रेम प्रकरण, एकीसोबत तर आज सुद्धा नाव

Latest Marathi News Live Update : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा गॅस पुरवठा खंडित असल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT